मटका अड्डयांवर धाड; 83 हजारांच्या मालासह 5 आरोपी ताब्यात

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

या कारवाईत आरोपी गौस अमीन इनामदार याचे घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुमारे 30,050 रुपये किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा मिळून आल्याने तो पुढील कारवाईसाठी मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

मंगळवेढा : तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई करताना नियुक्त जिल्हा पथकाने केलेल्या कारवाईत शहरात चालत असलेल्या तीन ठिकाणी मटका अड्ड्यांवर छापा टाकून गौस अमीन इनामदार, जुबेर अमीन इनामदार, शरद लक्ष्मण हजारे, महादेव मारूती जाधव,  दिलीप पारप्पा कोष्टी (सर्व राहणार- मंगळवेढा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे 53,230 रपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या मटका मालकांबाबत चौकशी केली असता शिवाजी तानगुडे, चंदू घुले, भीमराव मदगुल (सर्व रा. मंगळवेढा), कल्याण भोसले, महादेव शिंदे (दोघे रा. सरकोली, ता. पंढरपूर) अशी त्यांची नावे असल्याचे समजल्याने सर्व 10 आरोपींविरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत आरोपी गौस अमीन इनामदार याचे घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुमारे 30,050 रुपये किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा मिळून आल्याने तो पुढील कारवाईसाठी मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक संदीप धांडे, पो.ना अमृत खेडकर, अंकुश मोरे, पोकाँ सुरेश लामजने, अमोल जाधव, बाळराजे घाडगे, अनुप दळवी, सचिन कांबळे, सागर ढोरे पाटील, अक्षय दळवी, श्रीकांत जवळगे,  सिध्दाराम स्वामी, विलास पारधी, पांडूरंग केंद्रे, महादेव लोंढे यांच्या पथकाने भाग घेतला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: solapur marathi news mangalvedha gambling raid, five detained