सोलापूरः परिवहन कार्यालयात सुशीलकुमार शिंदेंनी भरला दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

कायदा व नियम सर्वांना समान आहेत. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही.
- सुशीलकुमार शिंदे

सोलापूर: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज (गुरुवार) सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन दंड भरला. वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्याने श्री. शिंदे यांना 2 हजार 560 रुपये दंड भरावा लागला.

श्री. शिंदे यांनी स्मार्ट कार्ड परवाना काढला. 1964 मध्ये मोटरसायकल व चार चाकी वाहनाच्या परवाना नुतनीकरणाची मुदत संपली होती. त्यांनी वाहन परवाना नुतनीकरण करुन घेतले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: solapur news sushil kumar shinde rto office Inflatable penalties