सोलापूर : ‘टीईटी’ देऊन शिक्षक झालेल्यांचा येईना अंदाज

प्रमाणपत्र पडताळणीसाठी मुदतवाढ; जिल्ह्यातील ८३ शिक्षकांनी दिले प्रमाणपत्र
TET Exam
TET Examsakal

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांसह(solapur jilha parishad) खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी त्यांच्याकडील टीईटी(TET) प्रमाणपत्र शिक्षणाधिकाऱ्यांकडे जमा करावेत, त्याची पडताळणी होणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सर्वांनी ६ जानेवारीपर्यंत प्रमाणपत्र जमा करण्याची मुदत होती. परंतु, २०१३ पासून किती शिक्षक नियुक्‍त झाले, याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडेच(Education Officer) नसल्याची बाब समोर आली. अनेकांनी प्रमाणपत्र(certificate) न दिल्याने त्यासाठी आता त्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे.

TET Exam
मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांची वणवण

टीईटी प्रमाणपत्रातील(TET certicate) बनाटगिरी उघड झाल्यानंतर १३ फेब्रुवारी २०१३ पासून वितरीत झालेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते प्रमाणपत्र थेट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे पाठविली जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८३ शिक्षकांनी प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यात जिल्हा परिषदेतील ४८ शिक्षकांसह खासगी शाळांमधील ५५ शिक्षकांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे खासगी शाळांमध्ये रुजू झालेल्या ५५ शिक्षकांनी ७० प्रमाणपत्र माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे जमा केली आहेत. जिल्हा परिषद अथवा खासगी शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गावरही नियुक्‍ती मिळेल या आशेपोटी त्या शिक्षकांनी प्राथमिक व माध्यमिकसाठी द्यावी लागणारी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. या आठवड्यात आणखी काहीजण प्रमाणपत्र देतील, असेही ते म्हणाले.

TET Exam
Corona - देशात दिवसभरात 2 लाख 82 हजार नवे रुग्ण; 441 जणांचा मृत्यू

जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये २०१३ नंतर नियुक्‍त झालेल्या शिक्षकांकडील टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने संबंधितांनी त्यांच्याकडील मूळ प्रमाणपत्र जमा जमा करावयाचे आहे. आणखी काही शिक्षकांकडून ते प्राप्त न झाल्याने त्यांना त्यासाठी वाढीव संधी दिली जात आहे.

- भास्करराव बाबर,

माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

TET Exam
सातारा : खांद्यावर गोळ्या झेलत शत्रूशी केला सामना

...तर नोकरीवरुन घरी बसावे लागणार

आर्थिक व्यवहार(Financial transactions) करून टीईटीची बनावट(TET) प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी शिक्षण परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे(tukaram supe) यास अटक झाली आहे. त्यानंतर १३ फेब्रुवारी २०१३ नंतर टीईटी उत्तीर्ण होऊन शिक्षक म्हणून नियुक्‍ती मिळविलेल्यांकडील प्रमाणपत्रांची पडताळणी केली जात आहे. प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांकडून त्या कालावधीतील प्रमाणपत्र मागवून घेतले जात आहे. प्रमाणपत्र न दिल्यास अथवा त्यासाठी टाळाटाळ केल्यास संबंधित शिक्षकांची नियुक्‍ती रद्द केली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com