esakal | सोलापूर: रेल्वे हॉस्पिटल प्लांटचे काम अंतिम टप्प्यात
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen production project

सोलापूर विभागांतील डॉ. द्वारकानाथ कोटणीस रेल्वे हॉस्पिटलमध्ये मिनिटाला 500 लिटर ऑक्‍सिजन निर्मितीच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

सोलापूर: रेल्वे हॉस्पिटल प्लांटचे काम अंतिम टप्प्यात

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज भासत होती. हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांतील डॉ. द्वारकानाथ कोटणीस रेल्वे हॉस्पिटलमध्ये मिनिटाला 500 लिटर ऑक्‍सिजन निर्मितीच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्लांटमुळे 150 रुग्णांची सोय झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

हेही वाचा: तावडे हॉटेलजवळ कोल्हापूर- सोलापूर बस आगीत जळून खाक

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आरोग्य विभागाकडून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता भासू नये, यासाठी मध्य रेल्वेकडून रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजन प्लांट उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी जवळपास 50 लाख रुपयांचा खर्च झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये सोलापूर रेल्वे हॉस्पिटलमध्ये देखील सध्या ऑक्‍सिजन प्लांटसाठी फाउंडेशनचे काम पूर्ण होउन येत्या दोन-तीन दिवसांत ऑक्‍सिजन प्लांट उभारला जाणार आहे. याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

हेही वाचा: सोलापूर: विसर्जन दिवशी गणेश मूर्ती संकलनासाठी शहरात शंभर केंद्रे

मागील आठवड्यात दिल्ली येथून ऑक्‍सिजन प्लांटचे साहित्य रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून उर्वरित कामाला वेग आला आहे. या हॉस्पिटलमध्ये दर मिनिटाला 500 लिटर क्षमता असलेला ऑक्‍सिजन प्लांट उभारणीचे काम पूर्ण होताच तिसऱ्या लाटेत ऑक्‍सिजनची कमतरता भासणार नसल्याचे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्‍सिजन मिळविण्यासाठी सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागली होती. नव्याने उभारण्यात येत असलेल्या ऑक्‍सिजन प्लांटमुळे कोरोनाबाधित आणि इतर रुग्णांची सोय झाली आहे.

हेही वाचा: सोलापूर : ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो!

ठळक बाबी

- 150 रुग्णांची झाली सोय

- दर मिनिटाला 500 लिटर होणार ऑक्‍सिजन निर्मिती

- दिल्ली येथून ऑक्‍सिजन प्लांटची यंत्र सामग्री दाखल

- प्लांटसाठी 50 लाख रुपयांचा खर्च

- हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजन बेड, व्हेंटिलेटरचा वाढविली संख्या

हेही वाचा: अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

बेडची चिंता मिटली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्‍सिजन गरज भासत होती. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने प्रत्येक विभागांत ऑक्‍सिजन प्लांटचे उभारणीचे काही महिन्यांपूर्वी सूचना दिल्या होत्या. याच पार्श्‍वभूमीवर सोलापूर रेल्वे हॉस्पिटलमध्ये देखील प्लांट उभारणीचे काम सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने ऑक्‍सिजन प्लांट उभारणीबरोबरच बेडची संख्या देखील वाढविली आहे. बेड वाढल्याने रुग्णांची सोय झाली आहे. यामुळे बेडची चिंता मिटली आहे.

हेही वाचा: महिन्यात दोन्ही डोस घ्या! 'नॅक'साठी सोलापूर विद्यापीठाचे अजब आदेश

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना बाधित रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता भासत असल्याने तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजन प्लांट सुरू करण्यात आले. हे काम येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होणार आहे.

- डॉ. आनंद कांबळे, वैद्यकीय अधिकारी, रेल्वे हॉस्पिटल, सोलापूर

loading image
go to top