#MondayMotivation: असाही एक रेडिओ जॉकी!

RJ-Satish-Navale
RJ-Satish-Navale

कोल्हापूर : "नमस्कार, आपण ऐकत आहात ब्रेनवाणी रेडिओ. ब्रेनवाणी रेडिओच्या सर्व श्रोत्यांना सतीशचा नमस्कार.'' सकाळची सुरुवात आपणास रेडिओच्या माध्यमातून सगळेजणच करत असतो. रेडिओ हे माध्यम केवळ ज्ञान, मनोरंजन आणि माहिती एवढ्यापुरताच मर्यादित न राहता सतीश यांच्या अंधाऱ्या आयुष्याला प्रकाश निर्माण करण्याचे काम करत आहे. 

कोल्हापूरतील दिव्यांग दृष्टीहीन सतीश नवले यांच्या आयुष्यात रेडिओमुळे प्रकाश निर्माण झाला आहे. त्यांच्यारुपाने कोल्हापूरकरांना एक नवीन आरजे मिळाला आहे. सतीश नवले यांना लहानपणापासूनच रेडिओ ऐकण्याची सवय होती. रेडिओ हा त्याच्या आयुष्याचा एक भाग झाला होता. लहानपणापासून  त्यांच्या जडणघडणीत या रेडिओने खूप मोठे काम केले.

जीवनाच्या या 'हमसफर' सोबतच आपण काम करायचं, असं सतीश यांनी ठरवलं. पुण्यामध्ये पदवी शिक्षण घेत असताना 'युवावाणी' मध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. मात्र, अंधत्वामुळे पुढे संधी मिळणार नाही, असे त्यांना वाटले. यावर मात करण्यासाठी पुढे जाऊन एम.एड.चे शिक्षण घेत असताना 'विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ'ची माहिती मिळाली. यामध्येच काम करायचं ठरवून सतीशने पुढील प्रवासाला सुरवात केली.

22 मार्च 2018 कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, अंध शिक्षण संशोधिका लता कोठारकर, पंडित विद्यासागर, डॉ. महेश देवकरसारख्या अनेक नामवंत लोकांसोबत एका नव्या प्रयोगाला त्यांनी सुरुवात केली. त्यात त्यांना यश मिळाले; परंतु हे काम कायमस्वरूपी करता यावं, याचा शोध त्यांनी घेतला आणि ऑनलाइन रेडिओवरती काम करण्यास सुरुवात केली.

रेडिओवरती काम करत असताना एकाचवेळी कमीत कमी तीन क्रिया कराव्या लागतात. यासाठी वेगळी टेक्निक्स वापरून आवाज, मिक्सर आणि कीबोर्ड याचा वापर कसा करता येईल? याचा शोध सुरू केला. त्यामध्ये त्यांना यश आलं आणि अनेक मुलाखती घेण्यास सुरुवात केली. यातच पुढे आपल्या अंध मित्रांना कम्युनिटी रेडिओमध्ये काम करता यावे, यासाठी सतीश प्रयत्न करीत आहेत. अंधत्वावर मात करून सतीश यांनी मिळवलेले हे यश नक्कीच अनेक दिव्यांगाना प्रेरणा देणारे आहे. 

येरळावाणी आणि ब्रेनवाणी कम्युनिटी रेडिओवरती अंध मित्रांना संधी मिळावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
- सतीश नवले, रेडिओ जॉकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com