स्वाभिमानी संघटनेचं ठरलं; ऊस परिषद होणार "या" तारखेला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 November 2019

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच नेते खुर्चीसाठी खटाटोप करीत आहे. त्यांना राज्यातील शेतकऱ्याकडे पाहायला वेळ नाही. निवडणुकीत पराभव झालो असलो तरी, शेतकऱ्यासाठी चळवळ थांबिवणार नाही. आणि 18 वरीस धोक्‍याचे असते. त्यामुळे आमची ही ऊस परिषद या येणाऱ्या सरकारसाठी धोक्‍याची असणार आहे, असा इशाराही श्री. शेट्टी यांनी दिला.

जयसिंगपूर (कोल्हापूर) - भारतातील 205 शेतकरी संघटना 17 देशातून शून्य टक्के कर आयात धोरणाला कडाडून विरोध करणार आहेत. या धोरणामुळे भारतीय शेतीमाल मातीमोल दराने विकावे लागणार आहे. चळवळीच्या अग्निकुंडासाठी ऊस परिषद काळाची गरज आहे. यासाठी 23 नोव्हेंबरला जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर अठरावी ऊस परिषद घेण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी चळवळपणाला लावू असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. 

सायकल चालवा; गुडघे वाचवा; डाॅ. अनंत जोशींचा स्वानुभवातून सल्ला 

उदगाव (ता. शिरोळ) येथे वरुड मोर्शीचे नुतन आमदार देंवेद्र भुयार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शेट्टी यांनी ऊस परिषदेची घोषणा केली आहे. 

ते म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बॅंकॉकला गेले आहेत. त्याठिकाणी प्रादेशिक अर्थिक भागिदारी करुन 17 देशात शुन्य कर आयातीवर एकामेंकात भागिदारी करार होणार आहे. आणि ते जर झाले तर परदेशातील वस्तू भारतात येतील आणि भारतातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही. प्रत्येक शेतकऱ्यांवर शेती विकण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे देशातील सुमारे 205 शेतकरी संघटना एकत्रित येवून या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. 

अबब ! बोकडाचे मटण 520 रुपये किलो 

कायद्याने नाही मिळाला तर चळवळीने दर घेऊ

राज्यातील सर्वच शेतीतील पिके अतिवृष्टिमुळे गेली आहेत. बॅंकाचे कर्ज भरायला पैसे नाहीत. अतिवृष्टिमुळे उसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे साखर कारखानदार उसाला कमी भाव देतील. पण कायद्याने दर मिळत नसला तर चळवळीने दर घेऊ. 

- राजू शेट्टी,  माजी खासदार 

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच नेते खुर्चीसाठी खटाटोप करीत आहे. त्यांना राज्यातील शेतकऱ्याकडे पाहायला वेळ नाही. निवडणुकीत पराभव झालो असलो तरी, शेतकऱ्यासाठी चळवळ थांबिवणार नाही. आणि 18 वरीस धोक्‍याचे असते. त्यामुळे आमची ही ऊस परिषद या येणाऱ्या सरकारसाठी धोक्‍याची असणार आहे, असा इशाराही श्री. शेट्टी यांनी दिला.

कोकणी शेतकरी आदित्यनां म्हणाला, आत्महत्येशिवाय पर्याय नायं 

परदेशातील दुध, साखर, कांदा, पामतेल, डाळी, मिरची, मसाले यासह वस्त्रोद्योग भारतात येतील आणि भारतीय शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही, असेही श्री. शेट्टी यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Farmers Organisation Sugarcane Conference on 23 November