'या' जिल्ह्याचा आता पालकमंत्री कोण?

praniti shinde
praniti shinde

सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : अजित पवारांना बारामतीकरांनी घातली भावनिक साद; पहा काय?

२०१९ ची विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडींमुळे ऐतिहासिक ठरली आहे. शिवसेना, भाजप व इतर पक्षांनी एकत्र येत महायुतीने व राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्याबरोबर इतर पक्षांनी आघाडी करून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र निकालानंतर वेगळच चित्र निर्माण झालं. त्यामुळे जिल्ह्यातही त्याचा परिणाम होणार आहे. भाजप व शिवसेनेचे पुन्हा सरकार येईल अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे नेत्यांचा भाजप व शिवसेनेकडे जाण्याचा ओघ वाढला होता. त्यामुळे काही ठिकाणी आघाडीला दमदार उमेदवारही मिळाले नाहीत. अशा स्थितीतही आघाडीने चांगल्या जागा मिळवल्या. मात्र निकाल लागल्यानंतर चित्र बदलले आहे.

बागल, पाटील यांचे काय?
करमाळा विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र यावेळी राष्ट्रवादीतून रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळाल्याने माजी आमदार नारायण पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली. त्यात दोघांचाही पराभव झाला. आता या दोघांचीही राजकीय वाटचाल कशी असणार, हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात ठाकरे सरकार! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री...

राष्ट्रवादीला काही ठिकाणी उमेदवारही नव्हते...
करमाळा मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे येथे राष्ट्रवादीला उमेदवाराचा शोध घ्यावा लागला. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले संजय शिंदे यांनीही येथे राष्ट्रवादीकडून उमेदवारी न घेता अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. राष्ट्रवादीने उमेदवार देऊनही त्यांचा प्रचार न करता शिंदे यांना पाठिंबा दिला. मात्र पुढे त्यांनी भाजचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढवली होती. 
 
बार्शीत सोपलांचा पराभव
बार्शी मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत विजयी झालेले दिलीप सोपल यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे घड्याळ काढून हातात शिवसेनेचे शिवबंधन बांधले होते. मात्र, त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

मोहिते पाटलांचे काय?
लोकसभा निवडणुकीवेळी कृष्णा- भीमा स्थिरीकरणाचे कारण करत जिल्ह्यात वर्चस्व निर्माण केलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मात्र मोहिते- पाटील यांनीही भाजपशी जवळीक वाढवली. त्यामुळे आता मोहिते-पाटलांचे पुढे काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापैकी कोण होणार मंत्री?
सोलापूर जिल्ह्यात माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून बबनराव शिंदे हे विजयी झाले तर पंढरपूर मतदारसंघातून भारत भालके, मोहोळ मतदारसंघातून यशवंत माने हे घड्याळ चिन्हावर विजयी झाले. करमाळा मतदारसंघातून शिंदे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. माळशिरस मतदारसंघातून उत्तमराव जानकर यांचा थोड्या मतावरून पराभव झाला तर भाजपचे राम सातपुते विजयी झाले. सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडून आल्या. या मतदारसंघात महेश कोठे यांना शिवसेनेची उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु, काँग्रेसमधून आलेले दिलीप माने यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे शिवसेनेतून बंडखोरी करून कोठे अपक्ष रिंगणात उतरले. शिवसेनेला फक्त सांगोला येथील शहाजीबापू पाटील यांच्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे जिल्ह्यात भालके, प्रणिती शिंदे, बबनराव शिंदे, पाटील, माने हे महाविकास आघाडीचे आमदार आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळात कोणाची वरणी लागणार, यावर तर्कवितर्क लावले जात आहेत.

महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com