का होत नाही पुस्तकांची खरेदी....?

Why Dont Perches Book Kolhapur Marathi News
Why Dont Perches Book Kolhapur Marathi News

कोल्हापूर : शाळा आणि महाविद्यालयांना पुस्तके खरेदीसाठी शासनाचा स्वतंत्र निधी नाही. वेतनेत्तर अनुदान हे इमारतीची देखभाल, वीजबिल, घरफाळा या कारणासाठी खर्च होते. त्यामुळे यातून अभ्यासक्रमाखेरीज अन्य अवांतर पुस्तके खरेदीसाठी पैसेच शिल्लक राहत नाहीत. पर्यायाने शाळा, महाविद्यालयांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्तची पुस्तके खरेदी करताना आर्थिक चणचण जाणवते. परिणामी शाळा, महाविद्यालयांच्या ग्रंथालयांत काही वर्षांनी पुस्तकांचीच कमतरता जाणवणार आहे.
 
शाळा, महाविद्यालय म्हटले की ग्रंथालय ओघाने आलेच. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाचनाची आवड लागावी, हा या ग्रंथालयांमागचा उद्देश आहे. जिल्ह्यातील काही शाळांनी रोज एक तास वाचनासाठी ठेवलेला आहे; तर काही महाविद्यालये वाचनासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दायित्वाची भावना तयार व्हावी, थोर लोकांचे चरित्र वाचून त्यांना जीवनाची दिशा मिळावी, यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त असणारी आत्मचरित्रे, कादंबरी, कथा, प्रेरक सत्यकथा या पुस्तकांच्या रूपानेशाळा,महाविद्यालयांच्या 
ग्रंथालयात असतात. 


अनुदान निधी अभाव
पूर्वी शासनाकडून पुस्तक खरेदीसाठी महाविद्यालयांना स्वतंत्र अनुदान दिले जायचे. शाळांनाही पुस्तक खरेदीसाठी अनुदान दिले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा निधी बंद आहे. त्यामुळे या शैक्षणिक संस्थांना वेतनेतर अनुदानातूनच पुस्तके खरेदी करावी लागतात. हे अनुदान वेळेवर मिळतेच, असे नाही. या अनुदानातून इमारतीची देखभाल, वीज व पाणी यांची बिले, घरफाळा असे खर्च करावे लागतात. शहरातील शाळांचे निम्मे वेतनेतर अनुदान तर घरफाळ्यातच जाते. जिमखाना आणि प्रयोगशाळेतील साहित्यही याच पैशातून घ्यावे लागते. त्यामुळे अभ्यासक्रमाखेरीज पुस्तके घेण्यासाठी शाळांकडे निधीच शिल्लक राहत नाही.


५० रुपये शुल्क घेऊनही....

पर्यायाने विविध विषयांवर प्रकाशित झालेली नवीन पुस्तके शाळांना घेणे शक्‍य होत नाही. पर्यायाने विद्यार्थ्यांना शाळेत ही पुस्तकेच उपलब्ध न झाल्याने त्यांना वाचनाची सवय लागत नाही. अनुदानित महाविद्यालयांना पूर्वी यूजीसीकडून भरघोस निधी मिळत होता. आता तो बंद झाला आहे. महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून वर्षाला ५० रुपये ग्रंथालय शुल्क घेतात. यातून फारसे पैसे मिळत नाहीत. जे मिळतात त्यातील निधीही अभ्यासक्रमातील पुस्तकांसाठी खर्च होतो. त्यामुळे अन्य पुस्तकांसाठी त्यांनाही बाहेरून मदत घ्यावी लागते. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पुस्तकांसाठी स्वतंत्र निधी द्यावा, अशी मागणी अनुदानित शैक्षणिक संस्था करीत आहेत. 

पुस्तकांसाठी स्वतंत्र निधी गरजेचा

शैक्षणिक संस्था म्हणजे ज्ञानमंदिरे आहेत. यात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तक खरेदीसाठी वेतनेत्तर अनुदान किंवा अन्य कोणताही निधी पुरत नाही. यासाठी शासनाने शाळा आणि महाविद्यालयांना पुस्तकांसाठी स्वतंत्र निधी दिला पाहिजे, तरच नवीन प्रकाशित होणारी आणि अद्ययावत माहिती असणारी पुस्तके खरेदी करता येतील. 
- क्रांतीकुमार पाटील, प्राचार्य

 

सामाजिक संस्थांचा आधार...
काही शाळा, महाविद्यालयांना सामाजिक संस्था, सार्वजनिक वाचनालये किंवा समाजातील दानशूर व्यक्ती पुस्तकांची भेट देतात. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना पुस्तकांसाठी काही प्रमाणात त्यांचा आधार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com