
बरखाच नव्हे, तर पूर्ण भंडारी कुटुंबाने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन उज्ज्वल यश मिळविले आहे.
पिंपरी : जिद्द व चिकाटीच्या जोरावर सर्व काही शक्य आहे. देशातच नव्हे तर परदेशातही अभिमानाने अनेक भारतीय आपला कर्तृत्वाचा झेंडा विविध क्षेत्रात फडकवीत आहेत. अशाच प्रकारे भारतीय वंशाची बरखा बिरेंद्र भंडारी ही वयाच्या २६ व्या वर्षी साउथ ऑस्ट्रेलियातील सुप्रिम कोर्टात सध्या बॅरिस्टर ॲण्ड सॉलिसिटर झाली आहे. भारतातील नातेवाइकांकडून सध्या या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. एवढेच नव्हे तर हे कुटुंब भारतीय सण, संस्कृती आणि परंपरा जपण्याचे काम ऑस्ट्रेलियामध्ये करत आहे.
- कोरोनाकाळात गरजूंना मदत करणाऱ्या 'युवा वॉरियर्स' चा सन्मान; YIN ने युवकांची यशोगाथा आणली पुढे
सध्या साऊथ ऑस्ट्रेलियातील अॅडिलेड शहरात हे कुटुंब राहत आहे. पिंपरी काळेवाडीतील सर्व्हे नंबर ६८ मध्ये एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये आजही हे कुटुंब राहते. वर्षातून एकदा सर्वजण एकत्र या ठिकाणी येतात. बिरेंद्र यांचे वडील हे एच.ए कंपनीत कामाला होते. आजोबा आर्मीमध्ये होते. काळेवाडीतील अल्फान्सो स्कूलमध्ये बरखाचे सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यामुळे कुटुंबातून शैक्षणिक वारसा मिळत गेला. बरखाला मेडीकलला जायचे होते. त्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र ते दुर्दैवाने ते झाले नाही. कालातंराने तिची रुची पाहून बॅरिस्टरकडे तिचा कल वाढला.
- Corona Update: पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा तीन हजारांचा आकडा ओलांडला
बरखाचे वडील बिरेंद्र हे मेलबर्न येथे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते पेशाने इंजिनिअर आहेत. तर आई पुष्पा भंडारी या बॅंकेत उच्च पदस्थ अधिकारी आहेत. बरखाच नव्हे, तर पूर्ण भंडारी कुटुंबाने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन उज्ज्वल यश मिळविले आहे. बॅचलर ऑफ लॉ, ॲण्ड लीगल प्रॅक्टिस केल्यानंतर बरखाने बॅचलर ऑफ कॉमर्स अंकाउटिंग ॲण्ड फायनान्सदेखील केलं आहे. सुरवातीपासूनच ती अभ्यासात हुशार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. लहानपणापासून तिला वेगळं काही करण्याची इच्छा होती, त्यामुळे ती स्वस्थ बसून राहिली नाही. आज तिचा कुटुंबीयांना अभिमान वाटत आहे.
- पुण्यात आजपासून पुन्हा निर्बंध; संचारबंदीची वेळ जाहीर, शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय
परदेशात असताना वेळेत शैक्षणिक मार्गदर्शन मुलांना मिळणं गरजेचं आहे. बरखाने वकिलीत एन्ट्रन्स परीक्षा दिली. कोरोना कालावधीतही अनेक केस स्टडीज तिने केल्या. नंतर बॅरिस्टरसाठी मुलाखत दिली. आणि तिला यश मिळाले.
- बिरेंद्र भंडारी, बरखाचे वडील,ऑस्ट्रेलिया
स्वप्नातही वाटलं नव्हतं की या देशात मी स्वतचं अस्तित्व सिद्ध करेल. सध्या प्रॅक्टि्स सुरु केली आहे. आई-वडीलांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आता या क्षेत्रात पुढे जाऊन स्वत:चा ठसा उमटवयाचा आहे. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे.
- बरखा भंडारी, बॅरिस्टर ॲण्ड सॉलिसिटर,ऑस्ट्रेलिया
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)