आवाजावरून होणार कोरोना चाचणीचा प्रयोग; उद्धव ठाकरे यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

‘व्यक्तीच्या आवाजावरून कोरोना चाचणीचा प्रयोग सुरू झाला आहे. तो यशस्वी होईल तेव्हा होईल. पण, पुढच्या महिन्यापासून राज्यात घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे,’’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले.

पिंपरी - ‘व्यक्तीच्या आवाजावरून कोरोना चाचणीचा प्रयोग सुरू झाला आहे. तो यशस्वी होईल तेव्हा होईल. पण, पुढच्या महिन्यापासून राज्यात घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे,’’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकार, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातर्फे अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारलेल्या जम्बो फॅसिलिटी रुग्णालयाचे ऑनलाइन उद्‌घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. 

पिंपरी महापालिकेच्या जीबीमध्ये 'वायसीएम'च्या डाॅक्टर भरतीवरून आरोप-प्रत्यारोप

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळेही ऑनलाइन सहभागी झाल्या. महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, पक्षनेते नामदेव ढाके, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोना रोखण्यासाठी उभारलेले हे रुग्णालय तात्पुरते असले तरी, सर्व सुविधांनी युक्त आहे. परंतु, नागरिकांमध्ये जनजागृती गरजेची आहे.

लालपरीची चाके धावू लागली, पण...

मास्क, सोशल डिस्टन्सिंग व वारंवार हात धुणे या तीन गोष्टी करायला हव्यात. एकदा कोरोना झाल्यावर पुन्हा होत नाही, असे समजू नका.’’ गणराया कोरोनाचे संकट दूर कर, सर्वांना निरोगी व दीर्घायुष्य लाभू दे, अशी प्रार्थनाही त्यांनी गणरायाकडे केली.

पवार म्हणाले, ‘‘कोरोना योद्धे चांगली सेवा देत आहेत. लसीबाबत चाचण्या सुरू आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यावर आहे. गणेश विसर्जन मिरवणूक काढू नका. संसर्ग वाढणार नाही, याची काळजी घ्या. प्रत्येकाने स्वतः:ला कोरोनापासून दूर ठेवा.’’

'वायसीएम'च्या परिचारिकांचे दोन तास कामबंद आंदोलन 

महापौर उषा ढोरे यांनी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंत व्यक्त केली. ‘‘घाई गडबडीत अशी घटना घडू शकते, यापुढे असे करू नका,’’ अशा शब्दांत त्यांनी कानपिचक्‍याही दिल्या.

उपलब्ध सुविधा...
ठिकाण - अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी
क्षमता - ८०० खाटा
ऑक्‍सिजन बेड - ६००
आयसीयू बेड - २००
सुविधा - आयसीयू, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर, डायलिसिस सुविधा
जागेचे एकूण क्षेत्र - २० हजार चौरस मीटर
रुग्णालय क्षेत्रफळ - ११ हजार ८०० चौरस मीटर 
वातानुकूलित क्षेत्र - ३९०० चौरस मीटर (आयसीयू निगेटिव्ह प्रेशर)
विद्युत पुरवठा - चार हजार किलो वॅट 
लिक्विड ऑक्‍सिजन मेडिकल टॅंक - २५ हजार लिटर 
रुग्णालय उभारणी सुरू - ६ ऑगस्ट २०२०
रुग्णालय कार्यान्वित - २६ ऑगस्ट २०२०
रुग्णालय चालविण्याचा कालावधी - ६ महिने
अपेक्षित खर्च - ८५ कोटी
खर्च विभागणी - राज्य सरकार ५० टक्के

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona test experiment will be based on sound Information of Uddhav Thackeray