पिंपरी-चिंचवड महापालिकेने एचए कंपनीकडून खरेदी केले एक कोटीचे सॅनिटायझर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

संसर्ग कालावधीतील निकड लक्षात घेऊन कंपनीला बूस्टर मिळण्यास होणार मदत 

पिंपरी : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कोविड केअर सेंटर व महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये तातडीची बाब म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एच.ए) कंपनीकडून एक कोटी सॅनिटायझरची व इतर अत्यावश्‍यक साहित्याची खरेदी केली आहे. भारत सरकारच्या माध्यमातून करारनामा न करता थेट पद्धतीने या साहित्याची खरेदी झालेली आहे. एच. ए. कंपनीने संसर्ग कालावधीतील निकड लक्षात घेऊन कंपनीला बूस्टर मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. उत्पादनाला कंपनीने प्राधान्य दिल्याने कंपनीची परिस्थिती पूर्वपदावर येण्यास काही अंशी मदत होणार आहे. 

गौरीपूजेला लागणारी फुले कुठून अन् कशी येतात माहितीय का? नसेल तर घ्या जाणून

गणेश मूर्तींचे विसर्जन कुठं करायचं? शिवसेनेचा सवाल

महापालिकेने 28 जुलैला सॅनिटायझर खरेदीच्या प्रस्तावास मान्यता दिली. स्थायी समितीच्या कार्योत्तर मान्यतेनंतर महापालिका आयुक्त यांच्या अंतिम मान्यतेने खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. अल्कोहोलिक हॅंड सॅनिटायझर 50 एमएलचे 83,702 नग, शंभर एमएलचे 12,994 नग खरेदी करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पाच लिटरचे 5447 कॅन व फेस शील्ड 3471, थर्मामीटर 244 नग खरेदी महापालिकेच्या माध्यमातून खरेदी करण्यात आले आहेत. कोरोना कालावधीत लागणाऱ्या या साहित्याची मिळून एक कोटी पाच लाख 39 हजार रुपयांची साहित्य खरेदी करण्यात आली आहे. पिंपरीतील, नेहरूनगर गोडाऊनमध्ये हा सर्व साहित्य पुरवठा करण्यात आला आहे. 

साहित्य............प्रति नग.........एकूण खर्च 
अल्कोहोलिक हॅंड सॅनिटायझर (50 एमएल)..........21.99.......20,91,713 
अल्कोहोलिक हॅंड सॅनिटाययझर (100 एमएल).......49.72........6,46,061 
हॅंडसॅनिटायझर कॅन (5 लिटर)...............1303.67........71,01,145 
फेस शील्ड...........47.20.........1,63,831 
इन्फ्रारेड थर्मामीटर........2200.......5,36,800 

कोरोना कालावधीत कंपनीने सर्वाधिक स्वस्त व उच्च दर्जाच्या सॅनिटायझरचे उत्पादन घेतले आहे. महापालिकेची निकड लक्षात घेता थेट पद्धतीने विक्री करण्यात आली आहे. एच. ए. कंपनीला या करारामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. कंपनीची डबघाईला आलेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. शहरातील शासकीय संस्था व खासगी कंपन्याने डिजिटल हेल्थ एटीएमलाही शहरातून प्रतिसाद मिळत आहे. सध्या कोरोनाच्या चाचणीसाठी नागरिकांनी मशिनलाही पसंती दिली आहे. 
- नीरजा सराफ, व्यवस्थापकीय संचालिका, हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स, पिंपरी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation purchase one crore rupees sanitizer from ha company