Talawade Fire: 'बहीण सुखरूप, पण भाची..? भावाचा हंबरडा! तळवडे अग्निकांडात हृदय हेलावणारे दृश्य

Talawade Fire: 'स्पार्कल कँडल' तयार करण्याच्या तळवडे येथील कारखान्याला आग लागली होती
Talawade Fire
Talawade FireSakal

पिंपरी: ‘मी बरी आहे. थोडंसं भाजलंय. ससूनला आणलंय. घाबरू नको, तू ये,’ अशा चाळीस वर्षीय सुमन गोधडे जखमी अवस्थेत भावाशी बोलल्या. भाऊ गणेशही तातडीने ससून रुग्णालयात पोहोचला. बहीण बोलत असल्याचे पाहून जिवात जीव आला; पण थोड्याच वेळाने पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातून त्यांची भाची राधा गोधडेबाबत फोन आला आणि मामाच्या पायाखालची जमीनच सरकली.

एकीकडे बहीण सुखरूप होती, तर भाची आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. काय करावे, बहिणीसोबत थांबायचे की भाचीकडे धाव घ्यायची, तिच्याबाबत बहिणीला काय सांगावे... अशा द्विधा मनःस्थितीत असताना गणेश यांनी ‘वायसीएम’ गाठले आणि भाचीचा चेहरा पाहून हंबरडा फोडला. उपस्थितही अश्रू रोखू शकले नाहीत.

सुमन बोधडे (वय ४०) आणि त्यांची मुलगी राधा (वय १९, रा. गणेशनगर, तळवडे, मूळगाव पाचवड, ता. चांदवड, जि. नाशिक) गेल्या दोन महिन्यांपासून रुपीनगरमध्ये राहात होत्या. सुमन यांचे बंधू गणेश अहेर यांच्या आश्रयाने कामानिमित्त त्या आल्या होत्या.

Talawade Fire
Alephata News : कांदा उत्पादक शेतक-यांनी कांदा लिलाव पाडला बंद

भावाशेजारीच भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहात होत्या. सुमन यांना तीन मुली आहेत. दोघींचे विवाह झाले आहेत. त्यांचे पती गावीच राहतात. सुमन व राधा स्पार्कन कॅंडल बनविण्याच्या कंपनीत कामाला जात होत्या. मात्र, शुक्रवारी लागलेल्या आगीत त्या जखमी झाल्या होत्या. उपचारापूर्वीच राधाचा मृत्यू झाला. सुमन यांच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत.

टेम्पोतून जखमी रुग्णालयात

घटनास्थळापासून जवळच माझी कंपनी आहे. कामगारांसोबत बोलत असताना राणा इंजिनिअरिंगमधून धूर येत असल्याचे दिसले. काही लोकही तिकडे धावत होते. त्यामुळेही आम्हीही पळालो. कंपनीच्या प्रवेशद्वारातून आगीच लोट येत होते. त्यामुळे लांबच थांबलो.

Talawade Fire
Pune News : पिंपरी-चिंचवडच्या स्फोटातील इतर दहा जणांची प्रकृती गंभीर; जिल्हाधिकारी ससूनमध्ये, रुग्णांची केली चौकशी

अग्निशामक दलासह स्थानिक माजी नगरसेवकांना फोन केला. मदत मागितली. तोपर्यंत समोरच्या आगीतून पाच-सहा महिला पळत आल्या. बाहेर आल्यावर त्या खाली पडल्या. रूग्णवाहिकेला फोन केला.

तोपर्यंत एका टेम्पोत सहा जणींना बसवून ‘वायसीएम’ रुग्णालयात पाठवले. एक महिला मात्र, दरवाजातच कोसळली. तिला आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, आगीमुळे पोचू शकलो नाही. त्यानंतर अग्निशामक बंब आला व आग आटोक्यात आणली, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com