लाईव्ह न्यूज

उद्यान देखभाल, नियुक्तीसाठी आता ‘दक्ष’

उद्यान देखभाल, नियुक्तीसाठी आता ‘दक्ष’
Published on: 

प्रदीप लोखंडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १४ : सार्वजनिक उद्यानांची देखभाल सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘दक्ष’ या नावीन्यपूर्ण ॲपची अंमलबजावणी केली आहे. हे वेब व मोबाईल आधारित प्लॅटफॉर्म आहे. यामुळे अधिकाऱ्यांना रोजच्या उद्यान देखभाल कामांची नियुक्ती, देखरेख व पडताळणी सक्षमपणाने करणे शक्‍य होत आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. ॲपद्वारे निकृष्ट कामगिरी करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. उद्यान विभागाच्या वतीने आतापर्यंत सुमारे ३४ लाख ७२ हजार ५०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
या ॲपद्वारे ठेकेदारांना प्रमुख कार्यक्षमतेच्या निर्देशांकावर (केपीआय) आधारित कामे दिली जातात. ही कामे पूर्ण करताना ठेकेदारांनी काम सुरू होण्यापूर्वीची आणि काम पूर्ण झाल्यानंतरची छायाचित्रे जिओ टॅगिंगसह ॲपवर अपलोड करणे बंधनकारक आहे. याच ॲपच्या माध्यमातून पर्यवेक्षक प्रत्यक्ष स्थळी जाऊन कामाची पडताळणी करत असून यामुळे अहवालांची अचूकता सुनिश्चित होऊन जुन्या कालबाह्य, कागदोपत्री प्रगती अहवालांवरचे अवलंबित्व कमी झाले आहे.
सध्या ३७ ठेकेदार शहरातील उद्यानांच्या देखभालीचे कामकाज पाहत आहेत. याशिवाय ॲपद्वारे कामांची प्रत्यक्ष तपासणी उपआयुक्त, उद्यान अधीक्षक यांच्यासह संबंधित वरिष्ठ निरीक्षक अधिकारी करत आहेत.

काय आहे ॲप
- महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त देखील या सर्व कामकाजाचे थेट व रिअल टाइम निरीक्षण करू शकतात
- ॲपच्या माध्यमातून नागरी सुविधांच्या देखभालीसाठी एक आधुनिक व परिणामकारक यंत्रणा कार्यान्वित
- फिल्ड अधिकाऱ्यांची उपस्थिती देखील ‘दक्ष’ ॲपद्वारे थेट नोंदवली जाते
- ठराविक कामे न करणाऱ्या ठेकेदारांना दंडाची सूचना थेट त्यांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे पाठविण्याची स्वयंचलित सुविधा

‘दक्ष’ ॲपच्या अंमलबजावणीमुळे उद्यान व्यवस्थापनामध्ये सकारात्मक बदल घडवत आहे. उद्यानाच्या देखभालीसंबंधी कामांची नियोजनबद्ध नोंद, त्याची तांत्रिक पडताळणी आणि तत्काळ कारवाई याची खात्री करणे सोपे झाले आहे. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुशोभित आणि सुरक्षित सार्वजनिक जागा उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश असून ‘दक्ष’ ॲप हे त्याकडे टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com