लाईव्ह न्यूज

दिव्यांगांचा मानसिक समुपदेशन कार्यक्रम उत्साहात

दिव्यांगांचा मानसिक समुपदेशन कार्यक्रम उत्साहात
Published on: 

पिंपरी, ता. १६ ः पिंपरी-चिंचवड महापालिका दिव्यांग भवन फाउंडेशन व प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या वतीने पहिला मानसिक आरोग्यविषयक समुपदेशन कार्यक्रम दिव्यांग भवन येथे संपन्न झाला.
पिंपरी-चिंचवड परिसरातील दिव्यांग बांधव तसेच संघटनेचे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक आयुक्त निवेदिता घारगे, परेश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमास नंदकुमार फुले, दत्तात्रेय भोसले, संगीता जोशी, सागर सुपल, धीरज नागे, भाग्यश्री मोरे आदी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग भवनच्या मानसोपचार तज्ज्ञ अपर्णा चव्हाण व आर्या तेंडुलकर यांनी मानसिक आरोग्याचे व्यवस्थापन कसे करावे यावर मार्गदर्शन दिले. राजेंद्र वाकचौरे यांनी प्रास्ताविक केले. असे कार्यक्रम वेळोवेळी घेऊन समाजातील इतर घटकांचेही समुपदेशन झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com