युवकांनी सतर्क राहून वाईट कृत्यांचा विरोध करायला हवा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 February 2021

‘समाजहित विरोधीकामे करून काही जण व परकीय शक्ती देशाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे उघड झाले आहे. युवकांनी सतर्क राहून वाईट कृत्यांचा विरोध करायला हवा,’’ असे मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी - ‘समाजहित विरोधीकामे करून काही जण व परकीय शक्ती देशाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे उघड झाले आहे. युवकांनी सतर्क राहून वाईट कृत्यांचा विरोध करायला हवा,’’ असे मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. 

पुण्यात तरुणीची आत्महत्या; विदर्भातील मंत्र्यांशी अफेअरची चर्चा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५५ व्या प्रदेश अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी जावडेकर बोलत होते. महापौर उषा ढोरे, ज्येष्ठ समाजसुधारक गिरीश प्रभुणे, परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. छगनभाई पटेल, प्रा. सारंग जोशी, सिद्धेश्‍वर लटपटे, सुधीर मेहता, प्रा. शिल्पा जोशी, प्रथमेश रत्नपारखी आदी उपस्थित होते. 

मराठी संशोधकाने दिल्लीतील धुक्याचे उकलले गूढ!

जावडेकर म्हणाले, ‘देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. पिक विमा दिला आहे. सतरा हजार कोटी रुपयांचा प्रिमियम शेतकऱ्यांनी दिला, त्या बदल्यात त्यांना नव्वद हजार रुपये दिले आहेत. किसान सन्मान योजनेतून दहा वर्षांसाठी दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याला लाभ दहा कोटी शेतकरी घेत आहेत.’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth should be vigilant and oppose evil deeds prakash javadekar