आचार्य अत्रे यांच्या 'श्यामची आई' या चित्रपटातील श्यामच्या अर्थात बालपणीच्या साने गुरुजींच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य समीक्षक माधव वझे (वय ८५) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा, अभिनेते-दिग्दर्शक अमित वझे, सून, नातवंडे असा परिवार आहे.