Vikrant Massey : विक्रांत मासीचं टॅक्सी ड्रायव्हरशी झालं जोरदार भांडण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

Vikrant Massey video went viral on social media : अभिनेता विक्रांत मासीचा टॅक्सी ड्रायव्हरशी हुज्जत घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Vikrant Massey
Vikrant MasseyEsakal

'12th Fail' फेम अभिनेता विक्रांत मासी एक वादग्रस्त कारणामुळे चर्चेत आलाय. सोशल मीडियावर विक्रांतचा कॅब ड्रायव्हरशी भांडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर एक टॅक्सी ड्रायव्हरने विक्रांतचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये विक्रांत आणि त्यांच्यात टॅक्सीच्या वाढत्या भाड्यावरून भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये कॅब ड्रायव्हर त्याच्याशी "तुम्ही इतके पैसे कमावता मग तुम्हाला पैसे द्यायला काय प्रॉब्लेम आहे?" असं म्हणत हुज्जत घालताना दिसला. तर विक्रांत यावरून भडकला, " हे माझ्या मेहनतीचे पैसे आहेत" असं म्हणाला. त्यांचं हे भांडण सोशल मीडियावर गाजतंय.

पहा व्हिडीओ:

Vikrant Massey
Vikrant Messey : विक्रांत मेस्सीने हातावर काढला मुलाच्या नावाचा टॅटू

अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत विक्रांतची साथ दिली. तर बऱ्याच जणांनी हा प्रोमोशनल व्हिडीओ असल्याचा अंदाज व्यक्त केला. चाहत्यांचा हा अंदाज खरा ठरला असून हे एक कॅब अपसाठी केलेला प्रोमोशनल व्हिडीओ होता.

या आधीही कलाकारांनी प्रोमोशनसाठी केलेले स्टंटस वादग्रस्त ठरले आहेत. पूनम पांडेने स्वतःच्या मृत्यूचं केलेलं नाटक चांगलंच गाजलं होतं. यावरून तिच्यावर खूप टीका झाली होती तर अभिनेत्री काजोलने ट्रायल या प्रोजेक्टसाठी तिचे सगळे इन्स्टाग्राम पोस्ट हाईड केले होते आणि ती खूप मोठ्या ट्रायलचा सामना करणार आहे असं तिने म्हंटलं होत. हे प्रकरणही बरंच गाजलं होतं.

दरम्यान, 12th fail या सिनेमाच्या यशानंतर विक्रांत 'साबरमती रिपोर्ट' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय तर याशिवाय त्याचे सेक्टर 16, TME हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. विधु विनोद चोप्रा यांनी 12th Fail या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं तर या सिनेमात विक्रांत सोबत मेघा शंकर हिची मुख्य भूमिका होती. त्यांचा हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. हा सिनेमा आयपीएस ऑफिसर मनोज शर्मा आणि श्रध्दा जोशी यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

Vikrant Massey
Vikrant Massey News : अखेर '12 वी फेल'च्या विक्रांत मेस्सीनं 'सारा अली खान'ची सगळ्यांसमोर मागितली माफी! काय होतं प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com