DEOOL BAND 2
esakal
RAGHAV SHASTRI ENTRY IN DEOOL BAND 2 VIRAL VIDEO: प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन केलेल्या 'देऊळ बंद २' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरनंतर सिनेमाबाबत चाहत्यांच्या मनात सिनेमाबाबत उत्सुकता अधिकच लागली आहे. या सिनेमाचा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या भागात गश्मीर महाजनी याने राघव शास्त्रीची भूमिका साकारली होती. आता ११ वर्षांनंतर दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या भागात शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आलीय. या सिनेमात मोहन जोशी स्वामींच्या भूमिकेत आहेत तर स्नेहल तरडे ही शेतकऱ्यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. परंतु दुसऱ्या भागात राघव शास्त्री पहायला मिळणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.