Kiran Mane: अभिनेता किरण माने यांना आयकर विभागाची नोटीस? पोस्ट करत म्हणाले...
Incone tax department: किरण माने हे सातत्याने भाजप सरकार आणि भाजपच्या धोरणांविरोधात आक्रमकपणे बोलत आलेले आहेत. सुरुवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपला आवाज बुलंद केला.
मुंबईः अभिनेते तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. स्वतः किरण माने यांनी तशा आशयाची फेसबुक पोस्ट केली आहे. शिवाय आयकर विभागाच्या कार्यालयाचा फोटोदेखील त्यांनी शेअर केलाय.