सुप्रसिद्ध निर्मात्याने संपवले जीवन ! दाक्षिणात्य सिनेविश्वाला बसला धक्का, पोलिसांकडून तपास सुरु

रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मृत्यूसमयी त्यांचं वय ५५ वर्षे होतं |After being taken to the hospital, doctors declared him brought dead. He was 55 years old at the time of his death
Soundarya Jagdish
Soundarya Jagdishsakal

Soundarya Jagdish| कन्नड चित्रपट निर्माते आणि उद्योजक सौंदर्या जगदीश यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांचं निधन झालं. रविवारी १४ एप्रिलला ते त्यांच्या बंगळुरूमधील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले. त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मृत्यूसमयी त्यांचं वय ५५ वर्षे होतं. (Kannada producer)

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी १४ एप्रिलला महालक्ष्मी लेआऊट या निवासस्थानी सौंदर्या यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण ही आत्महत्या आहे कि घातपात? त्यामागील नेमकं कारण काय? या दृष्टीनेही पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

Soundarya Jagdish
Soundarya Sharma : समुद्र किनाऱ्यावर सौंदर्याच्या हॉटनेसचा तडका...

जगदीश यांचा जवळचा मित्र श्रेयस यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले कि ,”आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर जगदीशचा मृत्यू झाला आहे. आम्ही त्याला तातडीने रुग्णालयात दाखले केले. मात्र, त्याला त्या ठिकाणी मृत घोषित करण्यात आले. जगदीश याला आरोग्यविषयक कोणत्याही समस्या नव्हत्या. या क्षणी तरी आम्ही नेमंक कारण सांगू शकणार नाही.” असं त्यांनी स्पष्ट केले.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार सौंदर्या यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी ठेवलं जाणार आहे.

बँकेच्या नोटिसीमुळे जगदीश यांनी उचललं टोकाचं पाऊल?

जगदीश यांना नुकतंच बँकेकडून नोटीसही पाठवण्यात आली होती. या नोटिसीमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं का या चर्चाही रंगल्या होत्या. या संदर्भांत त्यांचे मित्र श्रेयस यांना विचारलं असताना त्यांनी ही गोष्ट फेटाळून लावत नोटीस आणि आत्महत्येचा काहीही संबंध नाही असं सांगितलं.

Soundarya Jagdish
Maidan Movie Review: भारतीय फुटबाॅल संघाचे सोनेरी पान

पबमुळे अडकले वादात

सौंदर्या जगदीश यांच्या मालकीचा जेट लॅग नावाचा पब आहे. तो पब परवानगी नसतानाही ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ चालवल्याचा आरोप झाला होता. यामुळे ते वादात अडकले होते.परवानगी नसलेल्या वेळेत पार्टीचं आयोजन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या पार्टीत लोकप्रिय अभिनेते दर्शन, धनंजय, रॉकलाइन व्यंकटेश आणि इतर कलाकारही उपस्थित होते. याप्रकरणी पोलिसांनी दर्शनची चौकशी केली होती आणि त्यावेळी आरोपपत्रात ती डिनर पार्टी होती, असं म्हटलं होतं.

अप्पू पप्पू’, ‘स्नेहितरू’, ‘रामलीला’ आणि ‘मस्त मजा माडी’ यांसारख्या अनेक सिनेमांची निर्मिती सौंदर्या जगदीश यांनी केली होती. कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय निर्मात्यांपैकी ते एक होते. सोशल मीडियावर सेलिब्रिटीज आणि चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

Soundarya Jagdish
Moive Review: हळूवार फुलत जाणारी प्रेमकथा - ऊन सावली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com