
'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अश्विनीने मालिकेत राणू आक्कांची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिची 'आई कुठे काय करते' मधील अनघा ही भूमिकादेखील खूप गाजली. अश्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. ती राजकारणातही सक्रीय आहे. गडकिल्ल्यावर जाणं तिला प्रचंड आवडतं. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओदेखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच अश्विनीने नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट दिली होती. त्यानंतर तिला एका चाहतीचा मेसेज आला होता.