Vidya Balan: "...तेव्हा मला सिगारेट ओढायची सवय लागली"; विद्या बालननं सांगितला अनुभव

Vidya Balan: मुलाखतीमध्ये विद्यानं चित्रपटासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील सांगितलं.
Vidya Balan
Vidya Balanesakal

Vidya Balan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. चाहते विद्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. काही दिवसांपूर्वी विद्याचा 'दो और दो प्यार' (Do Aur Do Pyaar) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील विद्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. सध्या विद्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. अशातच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विद्यानं एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये विद्यानं चित्रपटासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील सांगितलं.

सिगारेटच्या व्यसनाबद्दल काय म्हणाली विद्या?

एका मुलाखतीमध्ये विद्याला सिगारेटच्या व्यसनाबद्दल विचारण्यात आलं. यावेळी विद्या म्हणाली, "मला असे वाटत नाही की मी हे कॅमेऱ्या समोर सांगावे पण मला स्मोकिंग आवडते. सिगारेट ओढल्यानं जर शरीरिला कोणतंही नुकसान होणार नसतं तर मी सिगारेट ओढली असती. मला सिगारेटच्या धुराचा वास खूप आवडतो. कॉलेजमध्येअसताना मी बस स्टॉपवर धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या शेजारी बसायचे आणि सिगारेटच्या धुराचा वास घ्यायचे. डर्टी पिक्चर चित्रपटानंतर मला सिगारेटची सवय लागली. मी दिवसातून 2-3 सिगारेट ओढायचे."

"तू कधी गुटखा खाल्लायस का?", असाही प्रश्न विद्याला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना विद्या म्हणाली, "अजिबात नाही"

Vidya Balan
Do Aur Do Pyaar Review: पती-पत्नीच्या नात्‍यामधील गुंतागुंतीवर बेतलेली कथा; कसा आहे 'दो और दो प्यार'?

'दो और दो प्यार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

विद्या बालनचा 'दो और दो प्यार' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी आणि इलियाना डिक्रूझ यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'दो और दो प्यार' हा चित्रपट रिलीज होऊन सात दिवस झाले असून sacnilkच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं आतापर्यंत 3.43 कोटींची कमाई केली आहे. आता विद्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Vidya Balan
Do Aur Do Pyaar And LSD-2 BO Collection Day 1: ‘दो और दो प्यार’ आणि ‘एलएसडी 2’ ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक सुरुवात; ओपनिंग-डेला केली एवढी कमाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com