Mission Lose Adipose: ऊर्जा साठवणारी केंद्रे रिकामी करणे हाच नवीन वर्षाचा संकल्प

जीवनाचा आस्वाद जर घ्यायचा असेल, तर यावर्षी संकल्प करूयात - मिशन लूज ॲडिपोज! ॲडिपोज टिश्यू म्हणजे मेद किंवा ऊर्जा साठवणारी केंद्रे असतात. ही केंद्रे रिकामी करायची हे टारगेट, हाच संकल्प.
Weight Loss Without Exercise
Weight Loss Without Exerciseesakal

डॉ. अमोल सप्तर्षि

वैद्यक शास्त्रातील प्रगती वाढतच आहे, त्याचा परिपाक म्हणून आपल्याला दीर्घकालीन आयुष्य लाभेल. पण आपण फिट असू तरच या वाढलेल्या आयुर्मानाचा आस्वाद घेता येईल.

सध्याच्या काळात जंक फूड, बैठी जीवनशैली यामुळे अगदी जाडी वाढण्यापासून ते मधुमेह किंवा हृदय विकार असे वेगवेगळे आजार होत आहेत.

त्यामुळे जीवनाचा आस्वाद जर घ्यायचा असेल, तर यावर्षी संकल्प करूयात - मिशन लूज ॲडिपोज! ॲडिपोज टिश्यू म्हणजे मेद किंवा ऊर्जा साठवणारी केंद्रे असतात. ही केंद्रे रिकामी करायची हे टारगेट, हाच संकल्प.

  • शंभर वर्षांच्या आयुष्यात पहिली तीस वर्षे शरीर कमावले असेल तर उरलेली सत्तर वर्षे त्याचा आस्वाद घेता येतो. त्यामुळे लहान वयातच व्यायामाचे महत्त्व समजून घ्या, मुलांना समजावून सांगा.

  • शक्यतो, जोर बैठका, सूर्यनमस्कार, सपाट्या असे व्यायाम प्रकार निवडा. त्याला कोणतेही साधन लागत नसल्यामुळेज्यांचा फिरतीचा व्यवसाय आहे, फिरतीची नोकरी आहे त्यांचाही व्यायाम बुडत नाही.

  • दर आठवड्याला, महिन्याला स्वतःचे टार्गेट वाढेल याकडे लक्ष द्या.

  • पोट अतिरिक्त वाढण्यापूर्वीच पोट कमी करण्याचे टार्गेट पूर्ण करा.

  • आपली कंबर, पोट, नितंब याच्या घेराकडे बारीक लक्ष ठेवा. त्यातील वाढ-घट यावर अवलंबून व्यायामाचे नियोजन करा.

Weight Loss Without Exercise
Dance Workout : नाचता नाचता व्यायाम!
  • बऱ्याच जणांना ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन यांसारखे आजार असतात. यावर जर सहज मात करायची असेल, तर अन्नपचनासाठी पुरेसा वेळ द्यायला शिका. त्याचा उत्तम फायदा होतो.

    ब्रेकफास्ट, लंच, डिनर यांच्यामध्ये पाच ते सहा तासाचा अवधी ठेवला तर पचन उत्तम राहते. उदाहरण द्यायचे तर, ब्रेकफास्ट सकाळी साडेसात वाजता, लंच दुपारी दीड वाजता, तर डिनर रात्री साडेआठ वाजता अशा वेळा ठेवल्याने अन्नपचनासाठी उत्तम अवधी मिळतो. कोणतेही औषध न घेता ॲसिडिटी आणि कॉन्स्टिपेशनवर सहज मात करता येते.

  • शाकाहार चांगला की मांसाहार चांगला, याची निष्फळ चर्चा टाळा. शाकाहार, मांसाहार कोणताही आहार चालतो, परंतु तो आहार व्यवस्थित पचतोय का याकडे पूर्ण लक्ष द्या आणि त्यातून मिळालेल्या कॅलरी खर्च करण्याकडे कल ठेवा.

  • व्यायाम केल्याने दमत असाल, तर आवडीचे खेळ खेळा. आवडीचा खेळ खेळल्याने फारसा थकवा येत नाही आणि मूडही एकदम फ्रेश होऊन जातो. त्यासाठी शक्यतो इनडोअर प्रकारचे खेळ निवडावेत. ऊन, वारा, पाऊस तीनही ऋतूंमध्ये आपण नियमितपणे खेळू शकतो.

Weight Loss Without Exercise
मी दरवर्षी संकल्पांची यादी करते आणि दुसऱ्याच गोष्टींना प्राधान्य देते.. (New Year Resolution)
  • खेळून अथवा व्यायाम करून घरी परत येण्यापूर्वी स्ट्रेचिंग करायला अजिबात विसरू नका. त्याने स्नायूंवर आलेला अनावश्यक ताण हलका होतो.

  • सुट्टीच्या दिवशी आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन व्यायाम करण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी डोंगर चढणे, पन्नास ते साठ किलोमीटर सायकलिंग अशा स्वरूपाचा मार्ग निवडा.

  • व्यायाम करताना मोकळ्या मैदानात अथवा मोकळ्या जागेत करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला ऑक्सिजनची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा मोकळी हवा आणि पुरेसा ऑक्सिजन मिळेल याकडे लक्ष द्या. बंदिस्त जागी व्यायाम करणे शक्यतो टाळा.

  • माणसाला श्रम होऊ नयेत यासाठी सायकलचा शोध लागलेला आहे. गिअरची सायकल श्रम अधिकच कमी करत असते. त्यामुळे सायकल चालवून जर पुरेसा व्यायाम व्हावा असेवाटत असेल तर किमान पन्नास किलोमीटर तरी सायकल चालवावी.

  • रनिंग करण्याची इच्छा असेल तर सर्वप्रथम रस्त्यावरती धावायला सुरुवात करायची. रस्त्यावरती दिव्याचे खांब समान अंतरावरती लावलेले असतात. सुरुवात करताना दोन खांबांच्या मधली गॅप चालायचे, नंतर दोन खांबांच्या मधली गॅप पळायचे.

    दर आठवड्याला आपले टार्गेट वाढवत न्यायचे. असे करत असताना आपण तीन-चार खांबांच्या मधले अंतर धावत जातो. अनेक खांबांच्या मधले अंतर चालत जातो. अशा पद्धतीने आपण सहज तीन ते चार महिन्यांनंतर सलग पाच किलोमीटर पळत जाऊ शकतो.

  • कोणत्याही वयोगटामध्ये कधीही व्यायाम सुरू केला तरी पहिले आठ ते दहा दिवस अंग दुखतेच. त्याकडे दुर्लक्ष करून जर तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले, तर यश तुमचेच आहे.

    -----------------

Weight Loss Without Exercise
New Year's Resolution : नवे संकल्प आणि साध्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com