Raveena Tandon Interview: 'आप शूटिंग के लिये मत आना, आपकी जगह करिष्मा कपूर को लिया है!' असा मेसेज यायचा अन...

मला अनिलसारखा पती मिळणे हे माझे भाग्य. त्यामुळे भूतकाळाबद्दल विचार करणं मी कधीच सोडलं. माझ्या आयुष्यात मी सुखी आहे.
Ravina Tandon exclusive interview
Ravina Tandon exclusive interview esakal

चित्रपट माझ्यासाठी सर्वस्व नाही. चित्रपटांखेरीजही माझी एक दुसरी दुनिया आहे, ज्यात टंडन कुटुंब, थदानी कुटुंब, माझा स्टाफ, माझं सोशल वर्क असं सगळंच आहे. माझं करिअर हे माझं पॅशन असलं तरी माझं सर्वस्व नाही. त्यामुळे कदाचित मी रिलेव्हंट ठरली असेन.

पूजा सामंत

रविना टंडनसाठी २०२३ हे वर्ष भाग्यशाली ठरलं, असं ती म्हणते. याच वर्षी तिला पद्मश्री (Raveena Tandon Interview) मिळाली. केजीएफ २ (KGF 2), आरण्यक वेबसिरीजमधल्या रविनाच्या परफॉर्मन्सची जोरदार तारीफ झाली.

कर्मा कॉलिंग ही तिची आणखी एक वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होतेय, त्याचबरोबर अक्षय (Akshay Kumar New Movie) कुमारसोबत वेलकम टू जंगलसाठी (Welcome To Jungle) शूटिंगही सुरू आहे. तिची मुलगी राशा अभिनयात पदार्पण करते आहे.

या सगळ्या विषयांवर रविनाच्या पाली हिलच्या बंगल्यात गप्पागोष्टी झाल्या. त्या मुलाखतीचा संपादित अंश... (Latest Entertainement News)

रविना, २०२३ सरलं.. कसं होतं हे वर्ष तुझ्यासाठी?

रविना टंडन : अतिशय उत्तम! अलीकडची काही वर्षं माझ्या जवळच्या व्यक्तींना मला पद्मश्री मिळेल अशी आशा होती. व्यक्तिशः मी त्याबद्दल विचार करणंच सोडून दिलं होतं आणि माझ्या ध्यानीमनी नसताना यावर्षी मला पद्मश्री मिळाली.

माझे टंडन आणि थदानी कुटुंबीय, अतिशय जवळचे आप्तेष्ट, मित्रमैत्रिणी यांना खूप आनंद (Bollywood Actress Raveena Tandon) झाला. ‘वेल डिझर्व्ह्ड’ असं सगळ्यांचं मत होतं हे विशेष. कुठलीही अपेक्षा न ठेवता आपलं काम आपण करावं, हे मी अलीकडे कायम ध्यानात ठेवते.

शल्य एकाचं गोष्टीचं वाटतं, मला पद्मश्री स्वीकारताना पाहायला डॅड या जगात नव्हते. माझं माझ्या अभिनयावर असलेलं प्रेम, निष्ठा, माझा संघर्ष, माझ्या आयुष्यातले चढ-उतार याचे डॅड (Bollywसाक्षीदार होते. ते हयात असते तर त्यांना परमानंद झाला असता. त्यांचं माझ्यासोबत दिल्लीत नसणं मला खूप भावुक करून गेलं.

तुझ्या चित्रपट कारकिर्दीला तीन दशकं उलटली आहेत. या प्रवासाबद्दल काय सांगशील?

रविना टंडन : माझं व्यक्तिगत आयुष्य आणि कारकीर्द याबाबत मी समाधानी आहे! गेली ३२ (Raveena Tandon Movies) वर्षं मी अखंड काम करतेय. अर्थात लग्न झाल्यानंतर आणि विशेषतः मातृत्वानंतर मी सिलेक्टिव्ह होत गेले. मला मोजक्याच पण क्लासी भूमिका करायच्या होत्या.

गोविंदा अनेक चित्रपटांमधील माझा सहकलाकार. त्याच्यासोबत मी अगदी कमर्शिअल भूमिका आणि गाणी केली. अखियों से गोली मारे असो किंवा तू चीज बडी है मस्त मस्त, टीप टीप बरसा पानी असो, या गाण्यांनी मला खूप लोकप्रियता दिली.

पुढच्या अनेक पिढ्यांना ही गाणी लक्षात राहतील, त्यावर पुढची पिढी डान्स करत राहील, त्यामुळे व्यावसायिक यश तसं महत्त्वाचं असतं. मला लिडिंग लेडी ऑफ बॉलिवूड अशी ओळख मिळाली. त्याचा मी पुरेपूर आनंद घेतला.

वय वाढलं तसं तशी मी आर्ट फिल्म वळले. दमन, शूल, अक्स, सत्ता या चित्रपटांमधून अशा व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या, ज्यांमुळे मला समाधान लाभले.

मी माझ्या भूमिकांमधून स्त्रियांसमोर सशक्त होण्याचा अप्रत्यक्ष आदर्श निर्माण केला आहे, असे मला वाटते. माझ्या भूमिकांमधून मला विविध व्यक्तिरेखांचे वेगळे जीवन जगण्याचा अनुभव मिळाला.

जीवनात, करिअरमध्ये हवे तेव्हा स्वीच ऑन- स्वीच ऑफ करता आले, हा आनंद काही औरच...! म्हणूनच मी समाधानी आहे. कमर्शिअल अभिनेत्री ते आर्ट फिल्म हा पल्ला गाठणं प्रत्येकीला शक्य होत नाही.

तुझ्या आयुष्यात आलेल्या चढ-उतारांचा तू कसा सामना केलास?

रविना टंडन : व्यक्तिगत प्रवासात आणि कारकिर्दीच्या प्रवासात अनेक खाचखळगे, अपयश, अडचणी, अपेक्षाभंग, मानहानी असे खूप काही घडत गेलं. खरं म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात अडचणी, अपमान, अपयश, नैराश्य असं खूप घडत असतं.

पण जीवनातील हे सगळे डाव आपण खेळतो, खेळावे लागतात; कारण थांबला तो संपला हे एक शाश्वत सत्य आहे. जीवनातील कटुता बाजूला सारून जो आनंदात जगतो तोच खरा आनंदयात्री, असं मला वाटतं.

माझ्या इतर अडचणींखेरीज एका मानहानीला मला वरचेवर तोंड द्यावं लागलं. त्याचं व्हायचं असं, मी लग्नाआधी जुहूला राहत असे. सकाळी शूटिंगला जाण्यासाठी मी माझ्या गाडीत बसत असे, आणि मला मेसेज येत असे, आप शूटिंग के लिये मत आना, आपकी जगह करिष्मा कपूर को लिया है । हे बरेचदा घडलं, कधी करिष्मा, कधी मनीषा, कधी तब्बू, तर कधी शिल्पा. या नायिकांनी माझे चित्रपट, माझ्या भूमिका हिरावून घेतल्या. यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दोष त्यांचा की निर्माता-दिग्दर्शकाचा हे माहीत नाही.

असे प्रकार अनेकदा घडले. त्या त्या क्षणी मनात खूप निराशा दाटून आली. पण निराशेचं मळभ झटकून मी पुन्हा कामाला सुरुवात करत असे. माझ्या बाबतीत जे घडलं तसं अनेकांच्या बाबतीतही घडलं असेल. पण माझ्यावर त्या दिवसांमध्ये अन्याय झाला खरा.

Ravina Tandon exclusive interview
MAMI Film Festival: MAMI फिल्म फेस्टिव्हलसाठी प्रियांका पोहोचली भारतात! गळ्यातील मंगळसूत्राने वेधलं लक्ष..

तीन दशकं अभिनेत्री म्हणून स्वतःला रिलेव्हंट ठेवणं कसं शक्य झालं?

रविना टंडन : माझ्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगने झाली. माझे डॅड निर्माता -दिग्दर्शक असल्यानं त्यांच्या मांडीवर बसून मी त्यांच्या चित्रपटांची शूटिंग पाहिली आहेत. त्यामुळे मी माझ्या जन्मापासूनच मी चित्रपटसृष्टीशी निगडित आहे.

सिनेमा विश्व जवळून पाहत मी मोठी झाले. माझं अभिनयात येणं ही अगदीच स्वाभाविक प्रक्रिया होती. मॉडेलिंगनंतर मला अभिनयात संधी मिळाली. १९९१मधला अनंत बालानी दिग्दर्शित पत्थर के फूल हा माझा पहिला चित्रपट.

सलमान खान नायक होता. या फिल्मला यश मिळालं आणि माझ्या करिअरने कधी ब्रेक असा घेतला नाही. काही असे चित्रपट मी केलेत, ज्यात मला रोल नाही पण गाणी गाजली.

पण काळाची पावले ओळखून मी आर्ट चित्रपटांकडे वळाले. संधी मिळाली तेव्हा ओटीटीवर आरण्यक ही वेबसिरीज केली, केजीएफ -२ केला. आता नुकतंच कर्मा कॉलिंग या वेबसिरीजचं चित्रीकरण पूर्ण केलं. आता ती लवकरच रिलीज होईल.

अनिल थदानीबरोबर माझं लग्न झालं तेव्हा मी स्वतःला संसारात झोकून दिलं होतं. रणबीर आणि राशा या दोन मुलांना वाढवलं. त्या काळात अत्यंत मोजके चित्रपट केले. आमच्या स्टाफपैकी एकाचं निधन झालं.

त्याच्या दोन मुली छाया आणि पूजा यांची देखभाल केली, त्यांना दत्तकही घेतलं. त्यांची शिक्षणं, करिअर, त्यांना त्यांच्या पायांवर उभं केलं. त्यांची लग्नं, बाळंतपण हे सगळं मनापासून केलं. अगदी थेट माझ्या पोटच्या मुली असाव्यात तसं केलं.

चित्रपट माझ्यासाठी सर्वस्व नाही. चित्रपटांखेरीजही माझी एक दुसरी दुनिया आहे, ज्यात टंडन कुटुंब, थदानी कुटुंब, माझा स्टाफ, माझं सोशल वर्क असं सगळंच आहे. माझं करिअर हे माझं पॅशन असलं तरी माझं सर्वस्व नाही. त्यामुळे कदाचित मी रिलेव्हंट ठरली असेन.

Ravina Tandon exclusive interview
Bahiraji Movie: शिवरायांची तळपती तलवार... गुप्तहेर बहिर्जी नाईकांची गाथा मोठ्या पडद्यावर

इंडस्ट्रीत काय बदल झालेले जाणवतात?

रविना टंडन : टेक्निकल बदल तर खूप झालेत. टेक्निकली आता आपले भारतीय चित्रपट हॉलिवूडपेक्षा कुठेही कमी नाहीत.

पूर्वी हिंदी चित्रपटांतल्या नायिका वयाच्या ३०-३५नंतर साहायक नायिका, आई, भाभी, मैत्रीण तर कधी अगदी चरित्र भूमिका करण्यास बांधील असत. त्यांचे ऑन स्क्रीन नायक मात्र वयाची साठी आली तरी हिरोची भूमिका करत, त्यांच्या मुलींच्या वयाच्या नायिकांसोबत रोमान्स करत, एकाच वेळी १५ गुंडांना लोळवत.

नायिकांना सिनेमातील प्रोटोगनिस्ट होण्याचा अधिकार उरत नसे, कारण त्यांनी वयाची तिशी उलटलेली असे. पण आता हे चित्र बदललेले दिसते. ओटीटीवर अनेक अभिनेत्रींना महत्त्वपूर्ण भूमिका मिळत आहेत.

मलाही आरण्यक आणि आता कर्मा कॉलिंगमध्ये मध्यवर्ती भूमिका मिळाल्या आहेत. या बदलाचा परिपाक म्हणूनच मला केजीएफ-२ मिळाला. मला हे बदल अतिशय महत्त्वाचे वाटतात. नायक आणि नायिका यांच्या मानधनातदेखील खूप तफावत होती. आता ही तफावतदेखील कमी होत चालली आहे.

नेपोटिझमबद्दल वारंवार चर्चा होते. यावर तुझं काय मत आहे?

रविना टंडन : मी एका प्रसिद्ध दिग्दर्शकाची मुलगी असून कधीही हा विचार केला नाही. किंवा माझ्या डॅडना मला लाँच करण्याचा विचार मनात आला नाही.

मॉडेलिंग ते सिनेमा, पुढे आर्ट फिल्म ते ओटीटी हे ट्रांझिशन आपोआप घडत गेले. ज्या निर्माता-दिग्दर्शक किंवा कलाकारांची मुलं जन्मापासून फिल्मी माहोलमध्ये वाढतात, त्यांच्यासाठी हे क्षेत्र अधिक जवळचं असतं.

अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन याचं बाळकडू त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेलं असतं. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, बिझनेस टायकूनचा मुलगा बिझनेसमध्ये येतो; त्यात कुणाला गैर वाटत नाही. पण अभिनयाच्या क्षेत्रात मात्र हा नेपोटिझम मानला जातो.

अमिताभ बच्चन यांचे आई-वडील अभिनयात नव्हते. दिलीप कुमार, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, राजेश खन्ना, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा अशा या क्षेत्रातल्या आघाडीच्या अनेकांचे पालक फिल्म क्षेत्रातले नव्हते, पण त्यांचे यश स्पृहणीय आहे.

त्यामुळे मला नेपोटिझम हा मुद्दा चुकीचा अन् बिनबुडाचा वाटतो. माझी मुलगी राशा अभिनयात आली, कारण तिला दिग्दर्शक अभिषेक कपूरने त्याच्या फिल्ममध्ये लाँच होण्याची ऑफर दिली.

मी तिला लाँच केले नाही. राशाला स्वतःहून ऑफर मिळाली. यात कुणी नेपोटिझमची चर्चा अजिबात करू नये.

Ravina Tandon exclusive interview
Flashback : चित्रपटात फ्लॅशबॅक दाखवणे ही देखील कलाच..!

अनेक अभिनेत्री निर्मितीत आहेत. काही आंत्रप्रेन्युअर झाल्या आहेत. तुला यापैकी कशात स्वारस्य आहे?

रविना टंडन : वीस-बावीस वर्षांपूर्वी मी स्टंप्ड चित्रपटाची निर्मिती केली. पण दुदैवाने माझी या (Latest Bollywood Marathi News) चित्रपटाच्या निर्मितीत फसगत झाली. मी फिल्म प्रॉडक्शनचा धसका घेतला.

पण याच फिल्मच्या सेटवर माझी वितरक अनिल थदानी यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचं नंतर प्रेमात रूपांतर झालं आणि पुढे लग्नही. तर, फसगत झाल्यानंतर चित्रपट निर्मितीचा विचार सोडून दिला.

अनिल स्वतः बिझनेसमन असल्याने एका घरात एकच बिझनेसमन असावा हेच योग्य. त्यामुळे मी आंत्रप्रेन्युअर होण्याचा विचारच केला नाही.. इट्स नॉट माय कप ऑफ टी! माझं अभिनयातच छान चाललं आहे.

तुझी मुलगी आता अभिनयाकडे वळली आहे, लेकीला काय सल्ला दिलास?

रविना टंडन : मी राशाची फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड आहे. पण मी तिची सावली नाही. तिला गरज असेल तेव्हा मी सतत मार्गदर्शन करेनच, पण तिनं तिच्या अनुभवातून शिकलं पाहिजे, असं माझं मत आहे.

मला माझ्या मुलीला स्पून फिड करायचं नाहीये. मेरी बेटी को दुनियादारी, प्रॅक्टिकल नॉलेज से सीख लेनी होगी । बच्चों को वक्त के साथ मॅच्युरिटी आ जाती है, यह मेरा मानना है ।

प्रदीर्घ कालावधीनंतर तू अक्षय कुमारसोबत वेलकम टू जंगल फिल्ममध्ये आहेस. एकेकाळी तुमची जोडी प्रसिद्ध होती. त्याच्यासोबत पुन्हा काम करण्याकडे तू कसे पाहतेस?

रविना टंडन : काळाचा महिमा अगाध आहे. जो बीत गयी सो बीत गयी ! One has to move ahead in life with changing times! मला अनिलसारखा पती मिळणे हे माझे भाग्य.

त्यामुळे भूतकाळाबद्दल विचार करणं मी कधीच सोडलं. माझ्या आयुष्यात मी सुखी आहे. एक कलाकार म्हणून मला त्याच्यासोबत काम करण्यात हरकत नाही, त्यालाही नसावी म्हणून आम्ही एकत्र सिनेमा करतोय.

वेलकम टू जंगल फिल्मचं शूटिंग सुरू झालं आणि त्याच दरम्यान श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टीनंतर त्याची तब्येत आता सुधारत आहे. पुन्हा लवकरच शूटिंग सुरू होईल.

---------------------

Ravina Tandon exclusive interview
Film Festival : सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळा रंगणार २०२४ मध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com