Premium|UAE OPEC Exit 2026 : ओपेकमध्ये मोठी फूट! अमिरातीचा बाहेर पडण्याचा निर्णय; जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ

Geopolitics of Oil and Gas : संयुक्त अरब अमिरातीने 'ओपेक'मधून बाहेर पडण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील इराणची नाकेबंदी यामुळे जागतिक तेल बाजारात खळबळ उडाली असून, इंधनाचे दर गगनाला भिडल्याने राजकीय आणि आर्थिक समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
Geopolitics of Oil and Gas

Geopolitics of Oil and Gas

esakal

Updated on

सामुद्रधुनी अडवून धरल्यामुळे तेल वाहतूक विस्कळित झाली असून, अनेक देशांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. त्यात अमिरातीने घेतलेली भूमिका आणि अशा या ‘तेलकट’ वातावरणामुळे आर्थिक आणि राजकीय वाट निसरडी झाली असून तिचा अन्वय लावणे म्हणूनच आवश्यक आहे.

ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टींग कन्ट्रीज’ अथवा ‘ओपेक’ या तेल निर्यातदार देशांच्या संघटनेमधून संयुक्त अरब अमिराती एक मे २०२६पासून बाहेर पडला असून, या देशाने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे तेलबाजारात एकच खळबळ माजली आहे. गेल्या काही वर्षांपासून सौदी अरेबियासोबत उडणाऱ्या खटक्यांमुळे अमिरातीने टोकाचे पाऊल उचलत आपण स्वतःची अशी स्वतंत्र वाट चोखाळू शकतो हे दाखवून दिले आहे. दोन दिवसांत इराणला गुडघे टेकायला लावू अशी फुशारकी मारत अंतिमतः स्वतःचे गुडघे फोडून घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबतचा संघर्ष अधिक जटिल करून ठेवला आहे. त्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझ सामुद्रधुनी अडवून धरल्यामुळे तेल वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक देशांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. त्यात अमिरातीने घेतलेली ही भूमिका आणि अशा या ‘तेलकट’ वातावरणामुळे एकूणच आर्थिक आणि राजकीय वाट निसरडी झाली असून तिचा अन्वय लावणे म्हणूनच आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com