किशोर पेटकरसात वर्षांतील विदर्भाची राष्ट्रीय क्रिकेटमधील प्रगती स्पृहणीय आहे. त्यांनी दोन वेळा इराणी करंडकही पटकावला आहे. संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेट अथवा आयपीएल गाजविणारे मोठे स्टार खेळाडू नसताना विदर्भाने साधलेली प्रगती कौतुकास्पद ठरली आहे..रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाने सात वर्षांच्या कालावधीत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावीत भारतीय क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिद्ध केले. विदर्भ क्रिकेट संघटनेसाठी २०२४-२५ मोसम अत्यंत यशस्वी ठरला. विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरी गाठली होती, मात्र अंतिम लढतीत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कर्नाटकने हा सामना ३६ धावांनी जिंकला असला तरी प्रतिष्ठित रणजी करंडक स्पर्धेत विदर्भाने संधी हातून जाऊ दिली नाही..यंदाचा रणजी करंडकाचा केरळ संघाविरुद्धचा घरच्या मैदानावर झालेला अंतिम सामना अनिर्णित राहिला असला, तरी पहिल्या डावातील महत्त्वपूर्ण आघाडी विदर्भाला २०१८-१९नंतर पुन्हा रणजी विजेतेपद मिळवून देणारी ठरली. केरळचे रणजी करंडक जिंकण्याचे स्वप्न त्यामुळे अधुरेच राहिले. विदर्भाने सर्वप्रथम २०१७-१८मध्ये रणजी करंडक पटकावला होता. २०२३-२४मध्येही त्यांनी अंतिम फेरी गाठली होती, पण मुंबईचा संघ वरचढ ठरला. त्याची भरपाई यंदा करताना अक्षय वाडकरच्या नेतृत्वाखालील संघाने उपांत्य लढतीत मुंबईला ८० धावांनी हरविले. सात वर्षांतील विदर्भाची राष्ट्रीय क्रिकेटमधील प्रगती स्पृहणीय आहे. त्यांनी दोन वेळा इराणी करंडकही पटकावला आहे. संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेट अथवा आयपीएल गाजविणारे मोठे स्टार खेळाडू नसताना विदर्भाने साधलेली प्रगती कौतुकास्पद ठरली..शानदार योगदानविदर्भाने २०२४-२५ मोसमात दिल्लीचा ३२ वर्षीय ध्रुव शोरे व कर्नाटकाचा ३३ वर्षीय करुण नायर यांना पाहुणे (व्यावसायिक) क्रिकेटपटू या नात्याने खेळविले. भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या उद्देशाने करुणने धावांचा पाऊस पाडला. राष्ट्रीय निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, तरीही तो विदर्भ संघासाठी महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला. करुणने एकदिवसीय स्पर्धेत पाच शतके ठोकली, तर रणजी करंडक स्पर्धेत चार शतकांसह नऊ सामन्यांत ८६३ धावा नोंदविल्या. विदर्भच्या अपराजित वाटचालीत स्थानिक युवा खेळाडूंचे सातत्य उठावदार आणि निर्णायक ठरले. अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज आदित्य सरवटेने विदर्भाला सोडचिठ्ठी देत केरळची कॅप डोक्यावर चढविली, मात्र त्याची अनुपस्थिती जाणवणार नाही अशी लाजवाब कामगिरी २२ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज हर्ष दुबेने बजावली. .Premium | IPL 2025 कोण जिंकणार? कोणता संघ सर्वात घातक? मिळालेल्या किमतीचं मोल कोण फेडणार?.एका रणजी करंडक मोसमात सर्वाधिक ६९ गडी बाद करण्याचा विक्रम या अष्टपैलू खेळाडूने केला. दुबेने फलंदाजी करताना ४७६ धावाही नोंदविल्या. संघातील आणखी दोन युवा फलंदाज लक्षवेधक ठरले. पहिलाच मोसम खेळणारा २१ वर्षीय दानिश मालेवारने दोन शतकांसह ७८३ धावा करताना विदर्भाच्या फलंदाजीस बळकटी दिली. मध्यफळीतील डावखुरा २४ वर्षीय चष्मेधारी यश राठोडने यावेळच्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करताना पाच शतकांसह ९६० धावा केल्या. कर्णधार ३० वर्षीय अक्षय वाडकरनेही ७२२ धावा केल्या..Premium| Sinner's Doping Controversy: टेनिसपटू सिनरला झुकते माप?.विकास, प्रगतीचा ध्यासअलीकडच्या काळातील राष्ट्रीय क्रिकेटमधील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या यशस्वी वाटचालीवरून त्यांनी युवा खेळाडूंच्या गुणवत्तेचा विकास आणि सातत्यपूर्ण प्रगतीचा ध्यास घेतल्याचे स्पष्ट जाणवते. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाने सर्वप्रथम रणजी करंडकास गवसणी घातली. पूर्वी १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक असलेले उस्मान घनी यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाने सलगपणे अंतिम फेरी गाठली. उस्मान हे स्थानिक युवा गुणवत्तेचे जाणकार असल्याचा फायदा संघाला झाला. विदर्भ संघटनेच्या क्रिकेट प्रशासन व विकास समितीचे प्रमुख असलेले भारताचे माजी वेगवान गोलंदाज प्रशांत वैद्य यांची दूरदृष्टी तेथील क्रिकेटला यशोशिखरावर नेणारी ठरली आहे.(किशोर पेटकर सकाळ माध्यम समूहाच्या दै. गोमन्तकचे क्रीडा वार्ताहर आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.