लिफ्टचा दोर तुटला अन् ते 2 कामगार...

workars.jpg
workars.jpg

पुणे : कोथरूड महात्मा सोसायटीच्या पुढे असलेल्या एका 20 मजली इमारतीच्या लिफ्टचे काम सुरु होते. त्यावेळी काम करणाऱ्या दोन कामगाराचा बाराव्या मजल्यावरुन खाली पडल्याने जागीच मृत्यु झाला आहे. ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजता घडली.

20 मजली इमारतीचे सर्व काम पूर्ण झाले असून सध्या लिफ्टचे काम सुरु होते. कामगार काम संपवून वरील टाकाऊ माल खाली घेऊन येत होते. त्यावेळी मालासमवेत दोन कामगारही खाली येत होते. लिफ्टमध्ये वजन वाढल्याने त्याचा दोर तुटला अन् त्यासमवेत कामगार खाली पडले. बारव्या मजल्यावरुन पडल्याने जागीच त्यांचा मृत्यु झाला. कामगाराना रुग्णलयात नेले, मात्र त्यापुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पुण्यात 20 मजली इमारीतवरून पडून 2 कामगारांचा मृत्यू 

दोन्ही कामगार पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. मसुबीर रहमान (वय २२, मुळ रा. बिलासपुर, बंगाल) व मोहम्मद मुस्लीम (वय २०, मुळ रा. कटीहार, बिहार) अशी मृत कामगारांची नावे आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका कामगाराने सांगितले की,''आम्ही सहा माणसे येथे सहाशे रुपये रोजाने काम करत होतो. मोहम्मद व मसुबीर हे बाहेरच्या बाजूने काम करत होते. पाळण्याचा दोर निसटला आणि ते दोघेही खाली पडले. 
पुणेकरांनो, पुण्यात पाऊस होणार कमी कारण...

''कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने पुरवलेली दिसत नव्हती. सेफ्टी बेल्ट, हेल्मेट असते तर कदाचित जीव वाचला असता. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे चालू आहेत. परंतु कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणा-या ठेकेदार, बिल्डर व कामगार अधिकारी यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे.'
- विजय डाकले, सामाजिक कार्यकर्ते

"मालाची ने-आण करण्यासाठीच्या लिफ्टमधून कामगार टाकाऊ माल घेऊन खाली येत होते. त्यामध्ये दोर तुटल्यामुळे ते खाली पडून दोघांचा मृत्यू झाला. वादळामुळे कामगार खाली पडले असे काही नाही." 
- प्रतिभा जोशी, पोलिस निरीक्षक, कोथरुड पोलिस ठाणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com