Videos : पुण्यातील शाळेत स्वराज्याच्या शिल्पकारांना मानवंदना!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 January 2020

या अनोख्या कलाकृतीनं डोळ्यांचं पारणं फेडलं. या उपक्रमाची दखल घेत आंतराष्ट्रीय संस्था " वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्डस् ,लंडन " या मध्ये नोंद करण्यात आली आहे व तसे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आले.

धायरी : पुण्यातील एका शाळेत शनिवारी (ता.25) स्वराज्याचे शिल्पकार राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालसुरे यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. या उपक्रमात सुमारे 4 हजार 4 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

झील एजुकेशन सोसायटीचे विद्यार्थी दरवर्षी 'प्रजासत्ताक दिना'निमित्त नवनवीन उपक्रम राबवत असतात. भारत देशाला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ३५० वर्षांपूर्वी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहणाऱ्या राजमाता जिजाऊ, हे स्वप्न सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराजांचं स्वराज टिकवण्यासाठी आपले बलिदान देऊन सिंहगड (कोंढाणा) गड पुन्हा स्वराज्यात आणणारे नरवीर तानाजी मालुसरे या तीन स्वराज्याच्या शिलेदारांची प्रतिकृती शनिवारी साकारली.

- एटीएसच्या पुण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला राष्ट्रपती पदक 

तसेच भारत देशात सन्मानाने फडकवल्या जाणाऱ्या तिरंग्याची प्रतिकृती या वर्षी झील एज्युकेशन सोसायटीने साकारली.

या अनोख्या कलाकृतीनं डोळ्यांचं पारणं फेडलं. या उपक्रमाची दखल घेत आंतराष्ट्रीय संस्था " वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्डस् ,लंडन " या मध्ये नोंद करण्यात आली आहे व तसे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या तिन्ही स्वराज्याच्या शिल्पकारांना मानवंदना देण्यात आली.

- 'तानाजी'च्या टीमने सिंहगड संवर्धनाची जबाबदारी घ्यावी : मानकर

ब्रिगेडियर दीपक भट यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या तरुणांना सजग राहून सामाजिक भान व देशप्रेम जपण्याचे आवाहन केले. याच बरोबर शिवाजी महाराजांचा युद्धनीती व गनिमी कावा भारतीय लष्करासाठी सदैव मार्गदर्शक आहेत, असे मत मांडले.

- 'शनिवारवाड्याला, पेशवे-होळकरवाडा नाव द्या'; मेळाव्यानंतर धनगर समाजाची मागणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4004 students of Zeal education society Pune create portrait of tricolour flag and Rajmata Jijau