४५ वर्षीय नातेवाईकाने अल्पवयीन बहिणींवर केला वारंवार बलात्कार

जनार्दन दांडगे
Saturday, 21 November 2020

उरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तेरा व चौदा वर्ष वयाच्या दोन सख्ख्या बहिनींच्यावर, मागिल दहा महिण्यापासुन त्यांचाच एक पंचेचाळीस वर्षीय नातेवाईक वारंवार बलात्कार करत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता. २१) उघडकीस आला आहे.

लोणी काळभोर (पुणे) - उरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तेरा व चौदा वर्ष वयाच्या दोन सख्ख्या बहिनींच्यावर, मागिल दहा महिण्यापासुन त्यांचाच एक पंचेचाळीस वर्षीय नातेवाईक वारंवार बलात्कार करत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता. २१) उघडकीस आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुनिल कोंडींबा जेधे (वय- ४५, रा. भिवरी ता.पुरंदर) हे त्या तेरा व चौदा वर्ष वयाच्या दोन सख्ख्या बहिनींच्यावर मागिल दहा महिण्यापासुन वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. पिडीत मुलींच्या मोठ्या बहिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी सुनिल जेधे याच्या विरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, सुनिल जेधे यास अटक करण्यात आले असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे. 

बर्निंग कारचे गूढ; कशी पेटली, वाहनात किती प्रवासी होते, माहिती उपलब्ध नाही

दरम्यान कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील बारा वर्षीय मुलीवर, मागिल वर्षभरापासुन मुलीच्या सख्ख्या आईच्या मित्राकडुनच वारंवार बलात्कार होत असल्याचा धक्कादायक प्रकार दोनच दिवसापुर्वी उघडकीस आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच, उरुळी देवाची हद्दीत दोन मुलींच्यावर नातेवाईकाकडुनच बलात्कार होत धक्कादायक प्रकार पुढे आल्याने, जवळच्या नातेवाईकाकडुन लहान मुलींच्यावर होणारे लैंगिक अत्याचार व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षितेतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Bharat ke Mahaveer: पुण्याचा रिक्षावाला दिसणार 'डिस्कव्हरी'वर; लॉकडाउनमध्ये स्थलांतरितांना केली होती मदत!

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल जेधे हा पंचेचाळीस इसम पत्नी व आपल्या मुलाबाळासह उरुळी देवाची हद्दीत भाड्याने राहत आहे. सुनिल जेधे हा उरुळी देवाची हद्दीतील विविध गोदामात मिळेल त्या ठिकाणी काम करुन, स्वतःची व कुटुंबाची उपजिवीका करतो. सुनिलची पत्नीही मिळेत त्या ठिकाणी काम करुन, संसाराला हातभार लावते. दरम्यान मागिल वर्षभरापासुन सुनिल जेधे यांच्या घरी, अनिता व सुनिता (दोघींचीही नावे बदलली आहेत) या अनुक्रमे तेरा व चौदा वर्षे वयाच्या दोन मुली राहण्यास आल्या होत्या. सुनिल जेधे याने मागिल दहा महिण्याच्या काळात वरील दोन्ही मुलींना आलटुन पालटुन, उरुळी देवाची हद्दीतील विविध लॉजवर नेऊन बालात्कार केले आहेत. सुनिल जेधे हा वरील दोन्ही मुलींना लॉजवर घेऊन गेल्यावर, लैंगिक अच्याचार बाबत सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत असल्याने दोन्ही मुली निमटपणे सुनिल जेधे याचे अत्याचार सोसत होत्या. 

शास्त्रज्ञ म्हणताहेत, 'पुण्यात कोरोनाची दुसरी लाट रोखणे शक्‍य!'​

दरम्यान सुनिल जेधे याचा वरील दोन्ही मुलींच्यावर बिनबोभाटपणे अत्याचार चालु असतानाच, दोन दिवसापुर्वी अनिता व सुनिता या दोघींची मोठी बहिण स्वाती (नाव बदलले आहे) अनिता व सुनिता यांना भेटण्यासाठी सुनिल जेधे याच्या घरी आली होती. शुक्रवारी दुपारी स्वाती ही दोन्ही बहिनींच्याबरोबर गप्पा मारत असतांना, अनिता व सुनिता या दोघींही मनमोकळे पणाने बोलत नसल्याचे स्वातीच्या लक्षात आले. यावर स्वातीने दोघींनीही घरापासुन थोडे दुर नेऊन, विचारपुस केली असता वरील वरील दोघींच्याबाबत घडत असलेला धक्कादायक प्रकार पुढे आला. यावर स्वाती हिने शुक्रवारी संध्याकाळी व शनिवारी दिवसभर पुन्हा एकदा अनिता व सुनिता यांच्याशी सखोलपणे चर्चा करुन, घडलेल्या घटनेची अधिक माहिती घेतली. व त्यानंतर स्वाती हिने लोणी काळभोर पोलिसात जाऊन घडलेल्या घटनेची मागिती पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक सुरज बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ हालचाली करुन, सुनिल जेधे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबरोबरच, त्यास राहत्या घरातुन जेरंबद केले. 

Corona Updates: पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या पोचली १० हजारांजवळ; सलग चौथ्या दिवशी वाढ!

याबाबत अधिक माहिती देतांना वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, तेरा व चौदा वर्ष वयांच्या दोन सख्ख्या बहिणीच्याबाबतीत घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक व निंदनीय आहे. गुन्हाची माहिती मिळताच, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी सुनिल जेधे यास अटक केली आहे. सुनिल जेधे हा वरील दोन्ही मुलींना ज्या ज्या लॉजवर घेऊन गेला होता, त्या सर्वच लॉजची सखोल माहिती घेण्याचे काम पोलिसांच्याकडुन चालु आहे. लॉजवर अल्पवयीन मुलींना प्रवेश देता येत नसतानाही, आरोपी वरील दोन्ही मुलींना घेऊन गेलेला आहे. त्या सर्वच लॉज मालकांच्या विरोधात कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करुन, पुढील कांही दिवसातच चार्जशिट दाखल करण्यात येणार आहे. कदमवाकवस्ती व उरुळी देवाची या दोन्ही गुन्हामधील आरोपींना जास्तीत जास्त कडक सजा कशी देता येईल या पध्दतीने पुरावे गोळा करण्यात येतील असे बंडगर यांनी यावेळी स्पष्ठ केले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 45 year old relative repeatedly raped his minor sisters