esakal | बारावी इंग्रजीच्या पेपरवेळी कॉपी करताना पकडले 82 जण
sakal

बोलून बातमी शोधा

82 student caught copying English paper

सर्वाधिक लातूरमध्ये तर मुंबई, कोकण विभागात शून्य

बारावी इंग्रजीच्या पेपरवेळी कॉपी करताना पकडले 82 जण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : बारावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने राज्यात 82 विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. कॉपीमध्ये लातूर पॅटर्न दिसून आला असून या विभागात सर्वाधिक 34 जणांवर कारवाई केली. तर मुंबई व कोकण या दोन विभागात एकही विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळलेला नाही. अशी माहिती राज्य माध्यमीक व उच्च माध्यमीक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिक्षण मंडळाकडून 12वी व 10वीची परीक्षा शांततेत व गैरप्रकार विरहीत व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. स्थानिक दक्षता समिती, केंद्रस्तर सभा, पालकसभा, विद्यार्थी उद्बोधन, प्रजासत्ताकदिनी प्रार्थना, पालकसभा घेऊन विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी जनजागृती केली होती. परीक्षेच्या दिवशी थेट कारवाई करण्यासाठी 273 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना ऐनवेळी सकाळी कोणत्या उपद्रवी परीक्षा केंद्रांना भेटी द्यायच्या याच्या सूचना मंडळाने दिल्या होत्या.

अनेकांना मागे टाकत 'ही' व्यक्ती बनली भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती

इंग्रजी विषयाची भिती असल्याने या पेपरला सर्वाधिक कॉपी करण्यासाठी विद्यार्थी तयारीत असतात. विशेषताः ग्रामीण भागामध्ये कॉपीचे प्रकरणे जास्त घडतात. त्यामुळे परीक्षा केंद्र प्रमुख, परीक्षक यांना व्यवस्थित लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

फ्लायओव्हरवरून मोटार खाली पडली, एकाचा मृत्यू तर पाच जखमी; व्हिडिओ पाहाच

इंग्रजीच्या पेपरला सर्वाधिक कॉपीची प्रकरणे लातूर विभागात झाली असून, तेथे 34 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पुणे विभागात 6, नागपूर 4, औरंगाबाद 7, कोल्हापूर 4, अमरावती 9, नाशिक विभागात 18 विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. तर मुंबई व कोकण विभागात एकाही विद्यार्थ्यावर कॉपीची कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.

loading image