पाटस ःदौंड तालुक्यातील कुसेगाव येथे प्रेमयुगलांचा विष प्राशन केल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी (ता. २३) सकाळी आठ वाजता नागरीकांना वनविभागाच्या हद्दीत हे प्रेमी तोंडाला फेस येवून बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलविले. मात्र,उपचारापुर्वीच दोघांचा मृत्यू झाला. ही आत्महत्या असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
तालुक्यातील कुसेगाव येथे अष्टविनायक मार्गाच्या काही अंतरावर वनविभागाचे क्षेत्र आहे. रविवारी (ता. २३) सकाळी आठ वाजता एक तरुण व तरुणी तोंडाला फेस येवून बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. त्यांच्या जवळच पिकांवर औषध फवारणीची बाटली होती. याबाबत नागरीकांनी तत्काळ पोलिसांना सांगितले. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलिस नाईक घन:शाम चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस निरीक्षक नागरगोजे, पोलिस पाटील गणेश शितोळे यांनी दोघांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात हलविले. मात्र, उपचारापुर्वीच दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, संबधित तरुण हा दौंड तालुक्यातील नानवीज तर तरुणी पाटस येथील आहे. हे प्रेमी मध्यरात्री घरातून निघून गेल्याचे बोलले जात आहे. सकाळी दोघांचा विष प्राशन केल्यामुळे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ही आत्महत्या असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, हा प्रकार नक्की काय आहे. याबाबत नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील म्हणाले, ''दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत. विच्छेदन अहवाल लवकरच प्राप्त होइल. तपासात पुढील बाबी निष्पन्न होतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.