
पुणे विभागात एकूण 30 लाख 98 हजार 39 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यांपैकी पाच लाख 50 हजार 790 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
पुणे : विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 लाख 50 हजार 790 झाली असून, सध्या 11 हजार 625 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजअखेर 15 हजार 379 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण 2.79 टक्के आहे. तर, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.10 टक्के इतके आहे.
- Corona Updates: काय सांगता! पुण्यातील १०५ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाला हरवलं
पुणे विभागात एकूण 30 लाख 98 हजार 39 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यांपैकी पाच लाख 50 हजार 790 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित तीन लाख 53 हजार 216 रुग्णांपैकी तीन लाख 35 हजार 861 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या आठ हजार 804 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित आठ हजार 551 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके असून, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.09 टक्के आहे.
- Farmers Protest: अंबानींच्या ऑफिसवर मोर्चा काढणार; राजू शेट्टींनी फुंकलं रणशिंग
उर्वरित जिल्ह्यांतील स्थिती :
सातारा जिल्हा :
एकूण बाधित रुग्ण - 53 हजार 231
बरे झालेले रुग्ण - 50 हजार 373
उपचार घेत असलेले रुग्ण - 1 हजार 114
मृत्यू - 1 हजार 744
सोलापूर जिल्हा :
एकूण बाधित रुग्ण - 47 हजार 753
बरे झालेले रुग्ण - 44 हजार 797
उपचार घेत असलेले रुग्ण - 1 हजार 288
मृत्यू - 1 हजार 668
- कोरेगाव भीमा शौर्यदिन: यंदा विजयस्तंभाला घरातूनच अभिवादन करा
सांगली जिल्हा :
एकूण बाधित रुग्ण - 47 हजार 280
बरे झालेले रुग्ण - 45 हजार 250
उपचार घेत असलेले रुग्ण - 307
मृत्यू - 1 हजार 723
कोल्हापूर जिल्हा :
एकूण बाधित रुग्ण - 49 हजार 310
बरे झालेले रुग्ण - 47 हजार 505
उपचार घेत असलेले रुग्ण - 112
मृत्यू - 1 हजार 693
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)