ABVP Protest at SPPU : अभाविपचा तोडफोड करत जोरदार राडा; अश्लील रॅप साँग प्रकरण तापलं

वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठकही अभाविपने उधळून लावली.
ABVP in SPPU
ABVP in SPPUSakal

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अश्लील रॅप साँग शूट केल्याच प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून विद्यापीठात राडा केला आहे.

शुभम जाधव नावाच्या एका मुलाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एक रॅप साँग शूट केलं होतं. या रॅप साँगवरुन राज्यात चांगलाच गोंधळ झाला होता. राजकारणातूनही यावर टीका केली जात होती. या रॅपरवर कारवाई करण्याची मागणीही होत होती. अशातच आता अभाविपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ABVP in SPPU
PM Narendra Modi : "नरेंद्र मोदी स्वतंत्र भारतातले सर्वात पुरोगामी व धर्मनिरपेक्ष पंतप्रधान"

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसंच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली बैठकही त्यांनी उधळून लावली आहे. विद्यापीठाच्या काही वस्तूंची तोडफोडही करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

ABVP in SPPU
Maharashtra Politics : "मोदी नावाचं वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी उडून जातील"

आपल्याला हे गाणं शूट कऱण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडी परवानगी दिली होती, असं हा रॅपर शुभम जाधवने सांगितलं. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत एका महिन्यात अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शुभमवर आता चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com