लाईव्ह न्यूज

Alandi News : आतां लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्‍वर समाधिस्थ ।।

संजीवन समाधी दिन सोहळ्याला वैष्णवांचा मेळा
sant dnyaneshwar maharaj sanjivan samadhi din
sant dnyaneshwar maharaj sanjivan samadhi dinsakal
Updated on: 
4 लेख बाकी

आळंदी - माउलींच्या समाधीपुढे स्थानापन्न नामदेवांच्या पादुका... समाधी मंदिरात केलेली पुष्प सजावट... वीणामंडपातील समाधी प्रसंगाचे रंगलेले कीर्तन... टाळमृदंगाचा टिपेला पोचलेला गजर अन् माउली माउलीचा अखंड जयघोष... अशा भारलेल्या वातावरणात गुरुवारी (ता. २८) दुपारी सव्वाबारा वाजता माउलींच्या समाधीवर तुळशीच्या मंजिरी आणि फुलांची मुक्त उधळण करीत बुधवारी माउलींचा ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा केला.

माउलींच्या समाधी प्रसंगाचे वर्णन नामदेव महाराजांचे सोळावे वंशज केशव महाराज नामदास यांनी कीर्तनातून केले. कीर्तन ऐकताना वारकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. या भावनिक समाधी सोहळ्यामुळे अवघी अलंकापुरी गहिवरली होती.

भीममुद्रा डोळा निरंजन मैदान ।

झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव ।।

नामा म्हणे आतां लोपला दिनकर ।

बाप ज्ञानेश्‍वर समाधिस्थ ।।

हीच भावना अवघ्या आळंदीत आज होती. निमित्त होते माउलींच्या संजीवन समाधी दिनाचे. आज शहरात सकाळपासूनच सगळीकडे फडांमधून माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन सुरू होते. देऊळवाड्यातही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com