जिल्हा न्यायालयाचे सर्व न्यायाधीश उद्यापासून राहणार उपस्थित; पण...!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज देखील सर्व न्यायाधीशांच्या उपस्थित सोमवारपासून एका शिफ्टमध्ये होणार आहे. लॉकडाउन आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केवळ तातडीच्या दाव्यांवर सुनावणी होईल.

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून मर्यादित न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थित कामकाज सुरू असलेल्या जिल्हा न्यायालयातील मनुष्यबळाची टक्केवारी आता वाढविण्यात आली आहे. सोमपासून (ता.14) न्यायालयातील सर्व कोर्ट हॉल (न्यायालये) सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्यात केवळ महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.

विद्यार्थ्यांसमोरील अडचणी संपेनात; प्रश्‍नसंच मिळण्यास अजून आठवडा उजाडणार​

पूर्वीप्रमाणे सर्व खटल्यांचे नियमित कामकाज चालणार नाही.
सर्व न्यायाधीशांनी न्यायालयात उपस्थित होऊन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी घ्यावी, असे परिपत्रक उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता.10) काढले आहे. त्यामुळे गेल्या साडेपाच महिन्यांपासून रेंगाळलेल्या न्यायालयीन कामकाजास काहीशी गती मिळणार आहे. सकाळी 11 ते दोन या वेळेत सुनावणी होणार आहे.

'कुठं नेऊन ठेवलंय पुणं आमचं?'; महापालिकेतील सत्ताधारी भाजपला काँग्रेसचा खडा सवाल

तत्काळ प्रकरणांवर सुनावणी व्हावी यासाठी 15 टक्के न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत न्यायालयांचे कामकाज सुरू होते. त्यात 7 सप्टेंबरपासून आणखी 15 टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या 30 टक्के क्षमतेने सुनावणी होत आहे. मात्र, न्यायव्यवस्थेवर पूर्वीपासूनच असलेला कामाचा ताण आणि त्यात कोरोनामुळे सुमारे 70 टक्के प्रकरणांची सुनावणी थांबल्याने कामाचा रेटा आणखीनच वाढला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयीन कामाचे प्रमाण वाढविण्याची मागणी करण्यात येत होती.

Video : 'चला आता स्वच्छ-शुद्ध हवा येऊ द्या'; भारत गणेशपुरेंचे नागरिकांना भावनिक आवाहन​

कौटुंबिक न्यायालयाचे कामही सोमवारपासून एका शिफ्टमध्ये :
कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज देखील सर्व न्यायाधीशांच्या उपस्थित सोमवारपासून एका शिफ्टमध्ये होणार आहे. लॉकडाउन आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केवळ तातडीच्या दाव्यांवर सुनावणी होईल. परस्पर संमतीने घटस्फोट दाखल करण्याचे दावे, मुलांचा ताबा अशा दाव्यांवर लॉकडाऊन काळात सुनावणी सुरू होती. आता सर्व न्यायाधीश उपस्थित राहणार असले तरी तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी होणार आहे. 

जिल्हा न्यायालयात 100 टक्के न्यायाधीश उपस्थित राहणार असले तरी सुनावणी केवळ महत्त्वाच्या प्रकरणांवरच होणार आहे. न्यायालयात पूर्वीसारखी नियमित सुनावणी होणार नाही. तसेच न्यायालय एकतर्फी आदेश देखील देणार नाही. त्यामुळे महत्त्वाचे आणि तत्काळ खटले असतील तरच वकिलांनी न्यायालयात यावे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विनाकारण गर्दी करू नये.
- ऍड. सतीश मुळीक,अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All court halls of Pune District Court will be started from Monday 14th September