Ambegaon Election Result 2021 : आंबेगाव तालुक्यातील गावांचे निकाल पाहा एका क्लिकवर

ambegao
ambegao

निरगुडसर : आंबेगाव तालुक्यातील जवळे येथे स्वयंभु महादेव ग्रामविकास पॅनेलने हनुमान ग्रामविकास पॅनेलचा ८/१ ने, शिंगवे येथे राष्ट्रवादीच्या श्रीभैरवनाथ माता जोगेश्वरी ग्रामविकास पॅनेलने शिवसेनेच्या भैरवनाथ माता जोगेश्वरी परिवर्तन पॅनेलचा ६/४  ने पराभव केला तर खडकीच्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५/० असा विजय मिळवत बाजी मारली. जवळे( ता.आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ९ जागेसाठी १८ उमेदवार रिंगणात होते यामध्ये स्वयंभु महादेव ग्रामविकास पॅनेलचे आठ उमेदवार निवडुन आले तर हनुमान ग्रामविकास पॅनेलचा एकमेव उमेदवार निवडुन आल्याने स्वयंभु महादेव ग्रामविकास पॅनेलने ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली.

- शिंगवे येथे राष्ट्रवादीच्या श्रीभैरवनाथ माता जोगेश्वरी ग्रामविकास पॅनेलने शिवसेनेच्या भैरवनाथ माता जोगेश्वरी परिवर्तन पॅनेलचा ६/४  पराभव केला याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक जागा बिनविरोध निवडुन आली असून दहा जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये राष्ट्रवादीच्या श्रीभैरवनाथ माता जोगेश्वरी ग्रामविकास पॅनेच सात तर शिवसेनेच्या भैरवनाथ माता जोगेश्वरी परिवर्तन पॅनेलचे चार उमेदवार निवडुन आले. खडकी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहा जागा बिनविरोध झाल्या होत्या मग उर्वरित पाच जागांसाठी तेरा उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये तीन अपक्ष उमेदवार होते ते तीन अपक्ष उमेदवार पराभूत झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाची एकहाती सत्ता आणण्यात सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ पोखरकर,भिवसेन भोर  व ग्रामस्थांनी यश मिळवले आहे.

निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे-

- खडकी ग्रामपंचायत विजयी उमेदवार दत्तात्रय जिजाभाऊ बांगर, सविता रोहीदास वाबळे, शिवाजी बापू शेळके, हेमलता हरिभाऊ चिखले, मयुरी कुंडलिक वाबळे बिनविरोध उमेदवार कृष्णा देवराम भोर, पोपट जिजाबा वाघमारे, प्राजक्ता निलेश बांगर, नारायण पंढरीनाथ बांगर, सोनल सुभाष अरगडे, प्रमिला नवनाथ दंडवते. 

- जवळे ग्रामपंचायत स्वयंभु महादेव ग्रामविकास पॅनेल-हरिचंद्र गोरक्षनाथ शिंदे, सुमन रामचंद्र खालकर, वृषाली उत्तम शिंदे, संगिता चिंधु साबळे, चंद्रकला अंकुश गायकवाड, दत्ताञय तुकाराम लायगुडे, अमोल शिवाजी वाळुंज, मनिषा तुषार टाव्हरे व हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या प्रमिला सुरेश गावडे. 
शिंगवे ग्रामपंचायत-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीभैरवनाथ माता जोगेश्वरी ग्रामविकास पॅनेल-शांताबाई नामदेव वाव्हळ, संतोष नामदेव वाव्हळ, उज्वला अजित वाव्हळ, नविना कविराज गाढवे, हिरामण पोपट गोरडे, मंगल दत्ताञय कासार व एक बिनविरोध सौ.सिता राम पवार व शिवसेनेच्या भैरवनाथ माता जोगेश्वरी परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार-शंकर भाऊ कासार, सोपान रामदास पाबळे, पल्लवी अमोल वाव्हळ, हर्षदा तुकाराम मेहेर

वळती गावात भार्गवराम पॅनेलचा १०-१ असा धुव्वा

निरगुडसर ता.18 वळती(ता.आंबेगाव)येथील झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धोंडीभाऊ भोर व भाऊ भापकर यांच्या भागडेश्वर महाविकास आघाडी पॅनेलने शरद बँकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे यांच्या भार्गवराम ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. भार्गवराम पॅनेलचा १०-१ असा पराभव केला. वळती (ता.आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या एकुण ११ जागांसाठी २२ उमेदवार आमने सामने उभे होते. दोन्ही पॅनेलकडुन चांगली प्रचारयंत्रणा राबवण्यात आली होती. धोंडीभाऊ भोर व भाऊ भापकर यांनी भागडेश्वर महाविकास आघाडी पॅनेलचे तर भार्गवराम ग्रामविकास पॅनलचे शरद बँकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे यांनी नेतृत्व केले होते यामध्ये भागडेश्वर महाविकास आघाडी पॅनेलचे १० उमेदवार चांगल्या मताने निवडून आले तर एक पराभूत झाला तसेच यांच्या भार्गवराम ग्रामविकास पॅनलचा एकमेव उमेदवार विजयी झाला तर तब्बल १० उमेदवार पराभूत झाले.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे -

वळती ग्रामपंचायत भागडेश्वर महाविकास आघाडी- आनंद वाव्हळ, पुष्पा लोखंडे, योगिता लोंढे, हनुमंत सुर्यवंशी, मंगल भापकर, अमृता भोर, मयुरी बो-हाडे, तेजस भोर, संदीप पवार, मयुरी भोर तर भार्गवराम ग्रामविकास पॅनलचे गोविंद गांजवे

पेठ ग्रामपंचातीच्या 13 जागांपैकी 8 जागांवर महिलांचे वर्चस्व

जयदीप हिरवे

सातगाव पठार : पेठ ता.आंबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकित एकुण असलेल्या13 जागांपैकी 8 जागांवर महिलांनी बाजी मारली आहे. उर्वरीत 5 जागांवर पुरूष उमेवार निवडणून आले आहेत. पेठ येथील ग्रामपंचायतीच्या 4 जागा बिनविरोध निवडूण आल्या होत्या. विशेष म्हणजे या चारही जागांवर महिलाच होत्या. राहीलेल्या 9 जागांसाठी निवडणुक लागली होती. यासाठी तब्बल 29 उमेदवार  रिंगणात उभे होते. 

वॉर्ड कं. 1 मध्ये नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी संभाजी काळे व राम तोडकर यांच्यात सरळ लढत होती. यामध्ये राम तोडकर यांनी विजय संपादन केला. वॉर्ड क्रं. 2 मध्ये सर्वसाधारण पुरूष साठी प्रथमेश काळे, भगवान धुमाळ, संतोष धुमाळ अशी तिरंगी लढत पहावयास मिळाली यामध्ये संतोष धुमाळ यांनी विजय संपादन केला. सर्वसाधारण महिला प्रवर्गामध्ये स्वाती काळे आणि अक्षदा शिंदे या महिलांमध्ये असलेल्या सरळ लढतीमध्ये स्वाती काळे यांनी विजयश्री संपादन केली.

वार्ड क्रं. 3 मध्ये सर्वसाधारण पुरूष प्रवर्गात उमेश तळेकर, मंगेश पवळे, संजय पवळे आणि सुनिल शिंदे अशी चौरंगी लढत् पहावयास मिळाली यामध्ये संजय पवळे यांनी विजय खेचून आणला. नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला यामध्ये अंकिता बिरदवडे, रोहिणी रासकर आणि मंगल रासकर या तीन महिला उभ्या होत्या. यामध्ये मागील पंचवार्षिकला सदस्य असलेल्या मंगल रासकर यांना पुन्हा एकदा मतदारांनी निवडूण दिले.

वॉर्ड क्रं. 4 हा सर्वाधीक चर्चेचा वॉर्ड ठरला होता. यातील निकालाकडे सर्व मतदारांचे लक्ष लागून होते. यामध्ये सर्वसाधारण पुरूष प्रवर्गात निलेश ढमाले, महेंद्र धुमाळ, जगदीश माठे, अशोक राक्षे, रामराव शिंदे या पाचजणांमध्ये लढत झाली. यामध्ये जगदीश माठे यांनी विजयश्री खेचून आणली. नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला प्रवर्गात उर्मीला कांबळे, सुनिता रासकर,  सुनिता क्षिरसागर या तीन महिलांमध्ये उर्मीला कांबळे या विजयी झाल्या. सर्वसाधारण महिला प्रवर्गात संध्या नेटके, अर्चना बुट्टे, प्रभावती बुट्टे या तीन महिलांमध्ये अर्चना बुट्टे या विजयी झाल्या.

वॉर्ड क्रं. 5 मध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गात मयुर काळे, संभाजी काळे, जयराम ढमाले आणि संजय भालेराव या चौरंगी लढतील मयुर काळे यांनी विजयश्री खेचून आणली. बिनविरोध निवडूण आलेल्या 4 जागांवर महिलाच असून या महिलांमध्ये मागील पंचवार्षिकला सरपंच पद भुषविलेल्या सुरेखा पडवळ यांचा समावेश आहे. तसेच रूपाली काळे, अश्विनी ढमाले, वैशाली मनोज पवळे या महिलांचा समावेश आहे. 

पेठ (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत विजयी उमेदवार
 

1.     राम बबन तोडकर
2.    संतोष बबन धुमाळ 
3.    स्वाती दिलीप काळे
4.    संजय कोंडिबा पवळे
5.     मंगल अर्जुन रासकर
6.    जगदीश दशरथ माठे
7.    उर्मिला किरण कांबळे
8.    अर्चना अनंथा बुट्टे
9.     मयूर श्रीराम काळे
10.    सुरेखा पडवळ 
11.    रूपाली काळे 
12.    अश्विनी ढमाले 
13.    वैशाली मनोज पवळे

थुगाव (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत विजयी उमेदवार  

१) विमल सोपान एरंडे
२) सुवर्णा रामदास गावडे
3) तुषार सुरेश एरंडे
4) अरुणा लक्ष्मण एरंडे 
5) मीराबाई पांडुरंग एरंडे 
6) भूषण महादू एरंडे 
7) शंकर दगडू एरंडे 
8) रेखा विश्वास एरंडे

मंचर ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय : १७ पैकी १६ जागा वर महाविकास आघाडी.

मंचर : आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंचर ग्रामपंचायतीच्या आठ जागांसाठी निवडणूक रिंगणात एकूण २१ उमेदवार उभे होते.महाविकास आघाडीचे सात व एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. महाविकास आघाडीचा एक, कॉंग्रेसचे दोन व भाजप सात व अपक्ष तीन उमेदवार पराभूत झाले.त्यामध्ये आंबेगाव तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार यांचा समावेश आहे.....सविस्तर वाचा

 
महाळुंगे पडवळ ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची
महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची झाली. शिवसेनेला दहा व राष्ट्रवादी काँग्रेस तीन जागा मिळाल्या. गेली पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली ग्रामपंचायतीची सत्ता शिवसेनेला खेचून आणण्यात यश आले आहे.   

आंबेगाव तालुका : निवडणूक निकाल 
 

डी. के. वळसे पाटील
 

मंचर ग्रामपंचायत : युवराज प्रल्हाद बाणखेले, वंदना कैलास बाणखेले, सुप्रिया शिवप्रसाद राजगुरव, पल्लवी लक्ष्मण थोरात,  माणिक संतोष गावडे,  कैलास गांजाळे,  अरुण बाणखेले,  श्याम थोरात, विशाल मोरडे, दिपाली थोरात, ज्योती निघोट, सविता दिनकर क्षीरसागर, रंजना आतार, किरण राजगुरू, सतीश बाणखेले, ज्योती प्रकाश थोरात, ज्योती संदीप बाणखेले.

पिंपळगाव तर्फे महाळुंगे  ग्रामपंचायत : वसंत राक्षे, पूजा बांगर, अर्चना राक्षे, सचिन बांगर, मोहिनी बांगर, दीपक पोखरकर, ज्योती पोखरकर, स्वप्निल बांगर, मथाजी पोखरकर, सुनिता बांगर, अरुण बांगर, सुजाता पोखरकर, शैला घेवारी.

अवसरी खुर्द ग्रामपंचायत : अनिल बाळू शिंदे, पूजा दिनेश शिंदे, प्रतिभा दिनेश खेडकर, कल्पना शंकर इंदोरे,उर्मिला किसन तांबे, वैभव पोपट वायळ,प्रवीण काशिनाथ भोर,जगदीश रामदास अभंग, सचिन गौतम ढोणे,सुवर्णा राजेश क्षीरसागर, स्नेहा विशाल टेमकर, कमलेश सखाराम शिंदे,विजया राजाराम भोर, सुनिता मारुती शिंदे, प्रसाद दत्तात्रय कराळे, राजश्री प्रमोद शेलार, अक्षय दत्तात्रय भोर.

आदर्शगाव भागडी ग्रामपंचायत : गोपाळराव लक्ष्मण गवारी, लता विलास उंडे , योगिता किरण आगळे, सुनंदा शामराव आदक, संदीप भाऊ उंडे , निर्मला पांडुरंग उंडे

गिरवलीत राष्ट्रवादीचे वर्चस्व

घोडेगाव : गिरवली (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 9 पैकी 5 जागा जिंकून सत्ता कायम राखली आहे. मागील वेळेपेक्षा राष्ट्रवादी पक्षाला यावेळी दमछाक करावी लागली.     येथे 9 जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने 5 जागा मिळविल्या त्यात एक गोपीनाथ राजगुरू बिनविरोध निवडून आले. मागील 5 वर्षात सरपंच राहिलेले संतोष सैद यांना नवखा उमेदवार संदीप सैद यांनी कडवी झुंज दिली. माजी चेअरमन राजश्री सैद पराभूत झाल्या आहेत. शिवसेना पुरस्कृत काळभैरवनाथ पॅनलचे 4 जण निवडून आले आहे. युवा नेते महेश आवटे हे विजयी झाले आहे.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ पॅनल - संतोष सैद, मंगल हगवणे, पूजा सैद, कल्याणी शिंदे, गोपीनाथ राजगुरू (बिनविरोध) शिवसेना पुरस्कृत काळभैरवनाथ पॅनल - महेश आवटे, कल्याणी शिंदे, जनाबाई हगवणे, रामदास सैद 

अवसरी खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय

मंचर : अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सोळा जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला आहे. तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले.

अवसरी खुर्द गाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आंबेगाव तालुक्यात लोकसंख्येत तिसऱ्या क्रमांकाचे गाव आहे. राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. या निवडणुकीत काही जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच दोन उमेदवारामध्ये लढती झाल्या. काही जागांवर शिवसेनेने उमेदवार हि उभे केले होते. पण शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, आनंदराव शिंदे, उपसभापती संतोष भोर, उद्योजक भरत भोर, आनंदराव पाटील, दिनेश खेडकर, गणेश वायळ, कल्याण टेमकर, तानाजी टेमकर, बाबू मन्यार यांच्या रणनीतीपुढे शिवसेनेचा निभाव लागला नाही. शिवसेनेला एकमेव जागा मिळाली. 
    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com