कधी थांबणार अत्याचारपीडित महिलांचा आक्रोश?

Atrocity
Atrocity

पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंग; लैंगिक अत्याचाराच्या सहा घटना 
पुणे - हैदराबाद आणि उन्नावमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या सहा घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा घटना थांबणार कधी?, असा संताप व्यक्त होत आहे. विविध उपाययोजना करूनही या घटना रोखण्यात अपयश येत आहे.

चतुःशृंगी परिसरात १२ वर्षीय विद्यार्थिनीचा रस्ता अडवून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी मंगेश मनोहर गायकवाड याला अटक केली आहे. पीडित तरुणी शाळेत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत असे. तिला रस्त्यामध्ये अडवून अश्‍लील बोलून तिचा विनयभंग करत होता. तसेच, या प्रकाराची माहिती तो पीडित विद्यार्थिनीच्या मैत्रिणीच्या आईला देऊन बदनामी केली. 

सिंहगड रस्ता परिसरात वडगाव परिसरात शाळेत निघालेल्या विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग करण्यात आला. मुलीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर पाठलाग करणाऱ्या दीपक जनमदास साह (वय २७, रा. आंबेगाव) याला अटक केली आहे.  

बिबवेवाडी परिसरात घरात एकट्या असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार १९ वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा पीडित मुलगी घरी एकटी असताना घरात घुसला. त्याने पीडित मुलीवर बलात्कार केला.

पांडवनगर परिसरात दारू पिऊन आलेल्या सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनेच्या तक्रारीवरून सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर नातेवाईक असलेल्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर पालकांना हा प्रकार समजला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांचा नातेवाईक असलेल्या ४५ वर्षे वयाच्या व्यक्तीसह एका महिलेवर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सहकारनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मोहन ऊर्फ सूरज बाळू गायकवाड (वय २४, रा.धनकवडी) याला अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com