भोर शहर बनले अनाधिकृत बांधकामांचे माहेरघर    

Bhor city became the home of unauthorized construction
Bhor city became the home of unauthorized construction

भोर :''शहरात होत असलेली अनाधिकृत बांधकामे, रस्त्यांवरील व सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे  यामुळे भोर शहराची ओळख अनाधिकृत बांधकामांचे माहेरघर अशी झाली आहे. नगरापलिका प्रशासनाकडून  संबंधितांना अभय देवून कठोर कारवाई केली जात नसल्यामुळे अनाधिकृत बांधकामांचे व अतिक्रमणे आदींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.''

नगरपालिका क्षेत्रातील विनपरवानगी, अनाधिकृत बांधकामे करून राहात असलेल्यांवर आणि खासगी व  सार्वजनिक जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून राहणाऱ्यांना नगरपालिकेमार्फत कारवाई केली जात नाही.  उलटपक्षी त्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मुबलक प्रमाणात दिल्या जात आहेत. त्यामुळे नियमीतपणे शासनाच्या नियमानुसार बांधकामे करून कर भरणा-यांच्या मनात आपण चूक केल्याची भावना निर्माण होत आहे.     

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

नगरपालिकेच्या हद्दीत विनापरवानगी बांधकामे मोठ्या प्रमाणात केली जात असूनही त्यांच्यावर कारवाई केली  जात नाही. बांधकाम सुरु असल्याची माहिती नागरिकांनी नगरपालिका प्रशासनास दिल्यानंतर केवळ दिखावा म्हणून एखादी नोटीस संबंधीताला दिली जाते. मात्र, त्यास बांधकाम करण्यास काही नगरपालिकेतील काही  पदाधिकारी मदत करतात. तर काही पदाधिकारी प्रशासनाच्या कारवाईत हस्तक्षेप करतात. याशिवाय बांधकाम पूर्ण  झाल्यानंतर त्याची नगरपालिकेकडे नोंदही लवकर केली जात नाही.

नगरपालिकेच्या चार वर्षानंतर होणाऱ्या सर्वेक्षणातच त्याची नोंद केली जाते. तोपर्यंत संबंधीत बांधकामाकडून कुठलाही कर घेतला जात नाही. मात्र त्या  बांधकामास पाणी व इतर सर्व सोयी पुरविल्या जातात. बांधकाम नियमाप्रमाणे नसेल तरीही त्यास प्रमाणपत्र दिले जाते.

सुनेनं बळकावलेल्या घराचा ताबा मिळाला सासूला; घटस्फोटानंतरही राहत होती घरात​
उपमुख्यमंत्र्यांचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल; शहरातील परिस्थितीबाबत ठरवले जबाबदार! 

शहरातील मुख्य रस्त्यांच्याजवळील जुन्या बांधकामाच्या नुतनीकरणाची परवानगी घेतली जाते. आणि तेथे पूर्णतः नवीन बांधकाम केले जाते. याकडे नगरपालिका गांभीर्यांने पाहात नाही. याशिवाय शहराच्या काही भागात  पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही. परंतु झोपडपट्टी व अनाधिकृत बांधकामांना भरपूर पाणी मिळते. याखेरीज अशा  बेकायदेशीर बांधकामे किंवा अतिक्रमण केलेल्यांना नगरपालिकेडून रस्ते, वीज, शौचालये, साफसफाई व कचरा  व्यवस्थापन या सुविधांकडेही विशेष लक्ष दिले जाते. त्यांच्या तक्रारींचे लगेचच निराकरण केले जाते. परंतु नियमाने राहणाऱ्यांच्या परिसराकडे दुर्लक्ष केले जाते. काही रहिवाश्यांना तर रस्ते व गटारे साफ करण्यासाठी  नगरपालिकेत नेहमीच तक्रार करावी लागते.

"अनाधिकृतपणे झालेल्या बांधकांमाना नोटीसा देण्यात येत असून त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे अधिकृतपणे नियमीत करण्यात येतील. आणि नवीन अनाधिकृत बांधकामे थांबविण्यात येतील. सर्व नागरिकांनी नवीन बांधकामे करण्यासाठी किंवा नुतनीकरण करण्यासाठी नगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे सक्तीचे केले जाईल. तसेच   अतिक्रमण करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कडक कारवाई केली जाईल".
- विजयकुमार थोरात मुख्याधिकारी भोर नगरपालिका

दहा हजार कोरोनामुक्त; आठवडाभरातील आकडेवारीने पुणेकरांना दिलासा 
प्रेमाचं नाटक करुन फसवलं; गर्लफ्रेन्ड आणि बाळाला सोडून बॉयफ्रेन्डने काढला पळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com