Vidhan Sabha 2019 : टिळेकरांना मताधिक्य देण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी एकत्र

BJP Shivsena party workers are working together to give votes For Tillekar
BJP Shivsena party workers are working together to give votes For Tillekar

पुणे मांजरी : महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या विजयासाठी भाजप सेनेसह घटक पक्षातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले आहेत. हडपसर येथील भैरवनाथ मंदिरात सर्वांनी एकत्र येत याहीवेळी टिळेकर यांनाच मताधिक्य मिळवून देण्याचा संकल्प केला.

भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचाराची सुरुवात हडपसर गावातील भैरवनाथाचे दर्शन घेऊन झाली. दरम्यान रविवारचे औचित्य साधून टिळेकर यांनी ग्लायडिंग सेंटरवर जात व्यायामासाठी येणारे मतदार व नागरिकांच्या भेटी घेऊन कमळ चिन्हाला मतदानाचे आवाहन केले. गांधीचौक, हडपसर गाव, ससाणेनगर, काळेपडळ, चिंतामणीनगर आदी परिसरातील मतदारांचीही त्यांनी भेट घेतली.

प्रस्थापित विकास साधण्यासाठी मतदार पुन्हा संधी देतील- टिळेकर

नगरसेवक मारुती तुपे, प्रमोद भानगिरे, उज्वला जंगले, माजी नगरसेवक विजय देशमुख, विजया वाडकर, हडपसर शिवसेना विभाग प्रमुख तानाजी लोणकर, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विकास रासकर, समिर तुपे, भूषण तुपे, माऊली कुडले, महेंद्र बनकर, सविता हिंगणे, संकेत झेंडे, संतोष खरात आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टिळेकरांच्या प्रचारासाठी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

उमेदवार टिळेकर म्हणाले, "मतदारसंघातील सर्व समाज घटकांच्या उन्नतीसाठी मी काम केले आहे. भौगोलिक विकास साधण्यात नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्या स्वप्नातील हडपसर मतदारसंघ घडविण्यासाठी मतदार मला निश्चितपणे पुन्हा एकदा संधी देतील, यावर माझा ठाम विश्वास आहे.' 

योगेश टिळेकरांना मताधिक्य देण्याचा मुस्लिम बांधवांचा संकल्प

नगरसेवक मारुती तुपे म्हणाले, "हडपसर मतदारसंघात कधीच झाली नाही एवढी विकास कामे आमदार टिळेकर यांच्या माध्यमातून पाचच वर्षात  झाली आहेत. मेट्रो, ससाणेनगर अंडरपास व कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून येथील पन्नास वर्षे रखडलेल्या वाहतुकीला दिशा देण्याचे काम झाले आहे. हा विकास परिपूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मतदारांनी योगेश टिळेकरांच्या मागे आत्मविश्वासाने उभे राहवे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com