Lockdown : 'होम क्वारंटाइन'चे उल्लंघन करणाऱ्या ८ परदेशींवर गुन्हा दाखल

Corona-Home-Quarantine
Corona-Home-Quarantine

पुणे : पर्यटनासाठी पुण्यात आलेल्या परदेशी नागरिकांना होम क्वारंटाइन होण्याचा आदेश दिल्यानंतरही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी टांझानिया या देशाच्या आठ नागरिकांच्या विरूद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परकीय नागरीक कायदा व साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायद्दा नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. 

सुलतान हरूना नगागीया, आशा मोहमदी इस्मायली, सेलेमनी अबास एमटोय, जमनी  जुमा इमफरू, अथुमनी इडी ममयंजो, रमधनी मोह्ममद बिलाई, सौमु स्वाहिबु हसानी, झायनबू रमधनी झुमा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, टांझानिया या देशाचे आठ नागरीक पाच मार्चला पुण्यात पर्यटनासाठी आले होते. त्यांची २४ मार्च रोजी नायडू रुग्णालयात कोरोनाची तपासणी करण्यात आली. मात्र त्यामध्ये त्यांच्या अहवालामध्ये कोरोना नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना १४ दिवस होम क्वारंटाइन होण्याचा आदेश देण्यात आला होता.

मात्र, संबंधित नागरिकांनी आदेशाचे उल्लंघन करीत होम क्वारंटाइन असतानाही कासेवाडी, कोंढवा, भवानी पेठ, हडपसर, घोरपडी येथे जाऊन समाजात सहभागी झाले होते. त्याद्वारे त्यांनी सरकारने दिलेल्या संचारबंदी आदेशाचे तसेच साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियमाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com