पुणे : २४ तासांत २४ रुग्णांची पडली भर; कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

पुणे जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णसंख्येमध्ये रविवारी एकूण 24 ने वाढ झाली आहे.

पुणे : पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्ण संख्या 128 वर पोचली असून, पुणे जिल्ह्यात 98, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापूर जिल्ह्यात दोन रुग्ण आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तपासणीसाठी 2 हजार 450 नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 298 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, 152 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 2 हजार 146 नमुने निगेटीव्ह आहेत. तर, 128 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 22 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आले आहे. 

- Lockdown :... म्हणून मोदींनी माजी पंतप्रधान अन् विरोधी पक्षनेत्यांना लावले फोन!

आजपर्यंत 17 लाख 5 हजार 931 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 78 लाख 70 हजार 783 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

- केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 'आयुष्मान भारत' योजनेंतर्गत होणार कोरोनाचा उपचार!

पुणे जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णसंख्येमध्ये रविवारी एकूण 24 ने वाढ झाली आहे. जिल्ह्यात रविवार अखेर एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यामधील कोरोना बाधित रुग्ण संख्या एकूण 98 झाली आहे. पुणे महापालिका क्षेत्रामध्ये रुग्णालयामध्ये 78 आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामधील रुग्णालयामध्ये 20 रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत 22 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आले आहे. 

- Coronavirus : लॉकडाउनचे भवितव्य जनतेच्या हाती - उद्धव ठाकरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infected population in Pune division has increased by 24 on Sunday