गुरुनानक जयंतीनिमित्त 'प्रकाशपर्व'; रात्रंदिवस 'वाहिगुरू'चा घोष 

guru-nanak-jayantii.jpg
guru-nanak-jayantii.jpg

पिंपरी : शीख धर्मीयांचे संस्थापक गुरुनानक देव यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त शहरात 'प्रकाशोत्सव' सुरू झाला आहे. या वर्षी 12 नोव्हेंबरला त्यांची जयंती 'प्रकाशपर्व' म्हणून साजरे केली जात असल्याने अनेक गुरुद्वारा आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहेत. भाविकांसाठी अखंड लंगर सेवा देत असून, रात्रंदिवस 'वाहिगुरू'चा ध्वनिनाद गुंजत आहे. 


शहरात श्री गुरुनानक दरबार, सुखसागर गुरुद्वारा, मुलसिंह दरबार, आदिअम्मा दरबार (पिंपरी कॅम्प), आकुर्डीतील श्री वाहिगुरू गुरुनानक मानसरोवर आश्रम गुरुद्वारा आहेत. शहरात सुमारे सत्तर हजारांवर शीख बांधव आहेत. यावर्षी गुरुनानक यांची 550 वी जयंती साजरी होत असून, श्री गुरुनानक दरबारमध्ये शीख धर्मीयांसाठी राहण्याची मोफत सोय केलेली आहे. सध्या याठिकाणी सोलापूर, नांदेड, नाशिक, धुळे, औरंगाबाद, दौंड आणि उल्हासनगरमधून भाविक आले आहे. येथे आकर्षक फुलांच्या स्वागत कमानी उभारल्या आहेत. जयंतीनिमित्त भाविकांना '550' कोरलेली शिक्के दिले जाणार आहेत. दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मोफत सर्वनिदान शिबिर पंधरा दिवसांपासून सुरू असल्याची माहिती गुरुनानक दरबार प्रबंधक समितीच्या सदस्यांनी दिली. 

पुण्यात प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकासह तिघांना अटक   

मध्यरात्रीपासून नगर कीर्तन 
गुरुनानक देवजी यांची जयंती 'प्रकाशपर्व' साजरे करण्यात येत असल्याने शीख भाविकांकडून प्रत्येक गुरुद्वारात आठवड्यापासून लंगरची सुविधा केली आहे. ढोल-ताशांचा गजर, आतषबाजीत रात्री अडीचपासून ते पहाटे पाचपर्यंत आकुर्डी, बिजलीनगर परिसरातून श्री संत बाबा जोगिंदर सिंहजी (मोनी साहिब) ट्रस्ट व श्री वाहिगुरू गुरुनानक मानसरोवर आश्रमाकडून "नगर कीर्तन' काढण्यात येणार आहे. या वर्षी तलवारबाजी प्रात्यक्षिकांचे खेळ दाखविण्यात येणार नाहीत. पिंपरी कॅम्पमधील श्री गुरुनानक दरबारकडून तीन नोव्हेंबर रोजी मिरवणूक काढण्यात आलेली आहे. 

पुण्यात भेळ विक्रेत्यासह कामगारास टोळक्‍याकडून दांडक्‍याने जबर मारहाण  

पंधरा दिवसांपासून कीर्तन सेवा 
त्रिपुरारी पौर्णिमेला 'प्रकाशपर्व' म्हणून साजरा केला जात असल्याने शहरातील गुरुद्वारांमध्ये पंधरा दिवसांपासून प्रसिद्ध कीर्तनकारांकडून अखंड कीर्तन सेवा सुरू आहे. भक्त रात्री अकरानंतर साहिबांपुढे अरदास सादर करत आहेत. श्री वाहिगुरू गुरुनानक मानसरोवर आश्रम गुरुद्वाराकडून दिवसातून तीन वेळा भाविकांना वेगवेगळा लंगर दिला जात आहे. हेल्पिंग हॅन्ड उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना मदत दिली जात आहे. कीर्तन आणि लंगरबरोबरच 'प्रकाशपर्व' उत्सव साजरा करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती शीख धार्मिक समितीच्या सदस्या संत्वना कौर यांनी दिली. 
पुण्यातील प्लॅस्टिकचे कप बनविणाऱ्या कंपनीत शॉर्टसर्कीटमुळे आग   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com