न्यूयॉर्कमध्ये निनादली 'जय शिवाजी, जय भवानी'ची गाज

Celebration of shivjayanti in New York
Celebration of shivjayanti in New York

पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देश दुमदुमत असतानाच परदेशातही 'जय शिवाजी, जय भवानी' ही गाज निनादली. शिवाजी महाराजांची जयंती न्यूयॉर्क शहरातील भारतीय दूतावासात प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छत्रपती फाऊंडेशनतर्फे अमेरिकेत गेली सात वर्षे शिवजयंती साजरी केली जाते. या वर्षी केंद्र सरकारचे वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा ग्रुप यांच्या संयुकत विद्यमाने
"शिवजन्म, शिवराज्यभिषेक उत्सवाचे काल नाट्य सादरीकरण करण्यात आले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, उद्योजक मनोज शिंदे, दूतावसातील अधिकारी ए. के. विजयकृष्णन आदी यावेळी उपस्थित होते. शिवजयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद झेंडे, गौरव दळवी, कल्याण घुले (अल्बनी), अभिनव देशमुख (जॉर्जिया), ऋषिकेश माने (पेनसिल्व्हेनिया), साकेत धामणे (न्यूयॉर्क), प्रशांत भुसारी (टेनेसी), प्रियंका कुरकुरे (न्यूजर्सी), श्रद्धा सहाणे (न्यूजर्सी), सुरेश गायकवाड (कनेक्‍टिकट) आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शिवनेरीची ‘शिवसुमन’ आता रायगडावर

विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला: महेंद्र सिनारे, रोहन डाबरे, अलिशा मर्चंट यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. फाऊंडेशनने डेन्व्हर (कोलोरॅडो) व डलास (टेक्‍सास) येथेही शिवजयंती साजरी केली. तज्ज्ञांनी तरुणांना उद्योजकता आणि करिअरबाबत मार्गदर्शक केले.

Video : शिवराई नाणं आजही खणखणीत

बघेल म्हणाले, "छत्तीसगड आणि विदर्भ हे एकाच बेरार प्रांताचे भाग होते आणि आजही मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक छत्तीसगड मध्ये राहतात असे सांगत महाराष्ट्रासोबत सामाजिक नाळ असल्याचे सांगितले. सातासमुद्रापार आपण इतक्‍या मोठया प्रमाणावर शिवजयंती साजरी करणे हे कौतुकास्पद आहे.''

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आज वाहतुकीत बदल

मनोज शिंदे म्हणाले, "गूगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या अनेक अमेरीकन कॉर्पोरेट जगतात आज भारतीय व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सारख्या उच्चपदांवर आहेत. त्यामुळे मराठी मुला-मुलींनी व्यवसायात उतरण्याची गरज आहे.''


Video : तळेगावात शिवजयंती भीमजयंती महोत्सव रथयात्रा; दिला सामाजिक ऐक्याचा संदेश

विजयकृष्णन म्हणाले, "अमेरिकेत शिवजयंती साजरी करणारी अमेरिकेतील हा प्रथम वाणिज्य दूतावास असल्याबद्दल अभिमान आहे. छत्रपती फाऊंडेशनच्या भविष्यातील सर्व कार्यक्रमांना सहकार्य दिले जाईल.'' 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com