चतुःशृंगी देवीच्या मंदिरात साधेपणाने नवरात्रौत्सव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

"राज्य सरकारने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन करून चतुःशृंगी देवीच्या मंदिरात या वर्षीचा १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. सरकारच्या नियमांनुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र ऑनलाइन पद्धतीने देवीच्या दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे," अशी माहिती श्री देवी चतुःश्रृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किरण अनगळ आणि कार्यकारी विश्‍वस्त देवेंद्र अनगळ यांनी दिली आहे.

पुणे - "राज्य सरकारने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन करून चतुःशृंगी देवीच्या मंदिरात या वर्षीचा १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. सरकारच्या नियमांनुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र ऑनलाइन पद्धतीने देवीच्या दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे," अशी माहिती श्री देवी चतुःश्रृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किरण अनगळ आणि कार्यकारी विश्‍वस्त देवेंद्र अनगळ यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवरात्रौत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरे केले जाणार आहेत. येत्या शनिवारी (ता.१७) सकाळी नऊ वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने महापूजा व महावस्त्र अर्पण करून मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे. नारायणशास्त्री कानडे गुरुजी आणि श्रीरामशास्त्री कानडे गुरुजी पौरोहित्य करणार आहेत. नरेंद्र अनगळ यांच्याकडे या वर्षीच्या पूजेची जबाबदारी आहे.

#PuneRains : भिगवणमध्ये घरे, दुकाने, बॅंकेत पावसाचे पाणी; कोटयवधीचे नुकसान

देवीची आरती दररोज सकाळी दहा वाजता आणि रात्री साडेआठ वाजता करण्यात येईल. रविवारी (ता.२५) सकाळी आठ ते अकरा या वेळेत नवचंडी होम करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी विजयादशमीनिमित्त देवस्थानचे कर्मचारी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिराच्या परिसरात सीमोल्लंघन करण्यात येणार आहे.

#PuneRains : कोथरूडमध्ये जोरदार पावसाने नाल्यालगतच्या घरात शिरले पाणी; भिंत पडल्याच्या घटना

देवीचे मंदिर आणि परिसरातील स्वच्छता व रंगरंगोटीची कामे पूर्ण करण्यात आली असून, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या वर्षी देवीच्या पूजेसाठी अकरा किलो चांदीची उपकरणे घडविण्यात आली आहेत. 

देवीचे दर्शन, सर्व धार्मिक सोहळ्यांचे थेट प्रक्षेपण :  "www.chattushringidevasthanpune.org" आणि 'www.chattushringidevasthan.org"या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. 
- भाविकांसाठी देवस्थानच्या फेसबूक पेजवर आणि यूट्यूबवर दर्शनाची सोय उपलब्ध आहे. - मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थेट दर्शनासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात येईल.

खडकवासलाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार, मुठा नदीत विसर्ग सुरू; सतर्कतेचा इशारा

मंदिराचा जीर्णोद्धार लवकरच
चतुःश्रृंगी मंदिराच्या जीर्णोद्धार प्रकल्पाला फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या हेरिटेज विभागाने मान्यता दिली आहे. नजिकच्या काळात बांधकाम विभागाची परवानगी मिळणे अपेक्षित आहे. ही परवानगी मिळताच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले जाणार आहे, अशी माहिती अनगळ यांनी दिली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chaturshrungi devi temple navratrotsav celebration pune