esakal | 'देणाऱ्याचे हात हजारो'; ऑनलाइन एज्युकेशनसाठी 'सीओईपी'नं विद्यार्थ्यांना दिले लॅपटॉप!
sakal

बोलून बातमी शोधा

Online_Education

सध्या कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबायला नको म्हणून 'सीओईपी'ने ऑनलाइन अध्यापन सुरू केले आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांकडे आहेत का, याचे सर्वेक्षण करण्यात आले.

'देणाऱ्याचे हात हजारो'; ऑनलाइन एज्युकेशनसाठी 'सीओईपी'नं विद्यार्थ्यांना दिले लॅपटॉप!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे; पण अनेक विद्यार्थांकडे त्यासाठी सुविधा नाहीत. समाजाच्या सहभागाने त्या उपलब्ध करून देण्याचा वस्तुपाठ पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) घालून दिला आहे. याद्वारा महाविद्यालयातील गरजू आणि गरीब असलेल्या 175 विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणे : ५८ वर्षानंतर झेडपी अध्यक्षांच्या बंगल्याचं झालं 'बारसं'!​

सध्या कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबायला नको म्हणून 'सीओईपी'ने ऑनलाइन अध्यापन सुरू केले आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांकडे आहेत का, याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार सुविधा नाहीत,‌ त्या‌ विद्यार्थ्यांचा विषय नियामक मंडळाच्या‌ बैठकीत मांडण्यात आला. संपूर्ण भारत आणि विदेशातील माजी विद्यार्थ्यांना त्यासाठी संपर्क करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी लॅपटॉप उपलब्ध झाले.
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाष देशपांडे याबाबत म्हणाले, "नियामक मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडला. ही सर्व मुले महाराष्ट्रातील गरीब आणि शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना मदत करण्याचा निर्णय तत्काळ घेण्यात आला. माजी विद्यार्थी‌ संघटना, दानशूर उद्योजक पुढे आले. सुमारे 80 लाख रुपयांची मदत झाली आणि सुमारे 175 विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी लॅपटॉप मिळाले."

केंद्राच्या विरोधात अजितदादाही मैदानात; कृषी विधेयकावर घेतली परखड भूमिका​

संचालक डॉ. बी. बी. आहुजा म्हणाले, "विशेषत: नियामक मंडळाने यासाठी पुढाकार घेतला. देशातील उद्योजक आणि परदेशातील माजी विद्यार्थ्यांना संपर्क केला. त्यांनी तत्काळ मदत केली. 'अवाया' आणि 'फिम आयक्यू' या कंपन्यांनीही मोठा हातभार लावला. यामुळे महाविद्यालयात दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि शेतकरी कुटुंबातून आलेल्या हुशार विद्यार्थ्यांना मदत मिळाली. 'सीओईपी'प्रती‌ आणि गरजू विद्यार्थ्यांप्रती समाजाची संवेदना आणि असीम प्रेम यातून व्यक्त‌ झाले आहे."

IPL 2020 : दिल्लीकरांनी वाजवला डंका; धोनी मैदानात येऊनही चेन्नईचा पराभव​

आताच्या काळात कॉम्प्युटरवर शिक्षण सुरू आहे, पण अनेक विद्यार्थ्यांना या काळात फी भरणेही अवघड आहे, त्यांना कॉम्प्युटर घेणे शक्यच नाही. अशा गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांची माहिती मिळाली, त्यावेळी प्रयत्न सुरू केले. अगदी अमेरिकेत‌ असलेल्या माजी विद्यार्थ्यांना संपर्क केला. त्यांच्यासह दानशूर उद्योजकांनी मदतीचे हात पुढे केले. यामुळे बुद्धिमान असलेल्या 175 विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळाले. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड आता पडणार नाही. समाजाने त्यांना भरभरून मदत‌ केली, याचा 'सीओईपी'ला सार्थ अभिमान आणि आनंद आहे. 
- प्रतापराव पवार (चेअरमन, नियामक मंडळ, सीओईपी)

ऑनलाइन शिक्षण घ्यायची, तर तशा सुविधा‌ हव्यात. त्यासाठी लॅपटॉपची‌ गरज असतेच. ही मदत महाविद्यालय आणि माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने मिळते, याचे खूप समाधान आहे. यातून यापुढील काळात आम्हालाही गरजूंना मदत करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
- जयदत्त जायभाये (विद्यार्थी, सीओईपी)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top