आगामी महापालिका निवडणूक काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

आगामी महापालिका निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी. तसेच, या निवडणुकीसाठी सिंगल वॉर्डपद्धतीचा आग्रह धरावा, याबाबत काँग्रेसने बोलाविलेल्या बैठकीत चर्चा झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी बोलाविलेल्या या बैठकीत एका नेत्याने पक्षातील पाकीट संस्कृतीवर थेट हल्ला चढविला.

पुणे - आगामी महापालिका निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी. तसेच, या निवडणुकीसाठी सिंगल वॉर्डपद्धतीचा आग्रह धरावा, याबाबत काँग्रेसने बोलाविलेल्या बैठकीत चर्चा झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी बोलाविलेल्या या बैठकीत एका नेत्याने पक्षातील पाकीट संस्कृतीवर थेट हल्ला चढविला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आगामी निवडणुकींच्या तयारीसाठी महापालिकेतील गटनेते आबा बागूल यांनी महापालिकेत पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. त्याला माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, वीरेंद्र किराड, दत्ता बहिरट. नगरसेविका सुजाता शेट्टी, लता राजगुरू उपस्थित होते. मात्र, विद्यमान नगरसेवकांपैकी अनेकांनी पाठ फिरविली. शहराध्यक्ष रमेश बागवे हे महाविकास आघाडीच्या बैठकीला गेले असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, असे कारण पक्षाकडून सांगण्यात आले. 

वचननाम्यात दिलेला शब्द शिवसेनेनं पाळला नाही; 'आप'ने केली सेनेच्या वचननाम्याची होळी

आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा विचार सुरू आहे. त्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अधिकृत भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही. परंतु शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये त्यावर दोन मतप्रवाह आहेत. तसेच सिंगलचा वॉर्ड असावा की दोन वॉर्डांचा मिळून एक असावा, यावर देखील पक्षात मतभेद आहे. आज झालेल्या बैठकीत शिवरकर यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरे जाण्याऐवजी काँग्रेसने स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. तसेच पक्षाने सिंगल वॉर्डसाठीच आग्रह धरावा, अशी भूमिका मांडली.

Bharat ke Mahaveer: पुण्याचा रिक्षावाला दिसणार 'डिस्कव्हरी'वर; लॉकडाउनमध्ये स्थलांतरितांना केली होती मदत!

पाकीट संस्कृती बंद व्हावी
विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या एका नेत्याने या बैठकीत आपले मन मोकळे केले. निवडणुकीनंतर पक्षाच्या उमेदवारांचा का पराभव झाला, याचा आढावा घेण्याची गरज होती. कोणी काम केले, कोणी नाही, याचा जाब विचारला गेला पाहिजे होता. परंतु, कोणत्याही नेत्याला त्याची गरज वाटली नाही. उमेदवाराला पक्षाच्या नेत्यांकडून ‘पाकिटा’साठी कसा त्रास दिला जातो, याचा अनुभव मी घेतला आहे. ही पाकीट संस्कृती बंद झाली पाहिजे, असे तो नेता म्हणाला.

खासगी-सरकारी भेदभाव न करता कोरोना चाचणी करा; शिक्षण संस्थाचालकांच्या विविध मागण्या

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress should contest the upcoming municipal elections on its own