आता महाविद्यालयांसमोर 'या' गोष्टीचे आव्हान!

ब्रिजमोहन पाटील
Monday, 15 June 2020

- प्राध्यापकांना प्रशिक्षणाची गरज
- पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे गरजेचे

पुणे : ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अडचणी येत असताना त्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयांकडे 'इ कंटेंट'चा तुटवडा आहे. या साहित्याची निर्मिती कशी करावी याचे प्रशिक्षणही प्राध्यापकांकडे नाही, त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचे आव्हान महाविद्यालयांसमोर निर्माण झाले आहे.

'कोरोना'चा प्रभाव पुढील काही महिने असणार आहे. याचा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात परिपत्रक काढून शैक्षणिक आराखडा तयार करण्याच्या सूचना महाविद्यालयांना दिलेल्या आहेत. यामध्ये १ सप्टेंबरपासून प्रथम वर्षाचे तर १ ऑगस्टपासून इतर वर्षांचे ऑनलाईन व ऑफलाईन वर्ग सुरू करण्याबाबतही सांगण्यात आले आहे. 

आणखी वाचा - लॉकडाउनमुळं पिकात केला बदल, आता खेळतोय लाखात

पुणे विद्यापीठाच्या स्तरावर ऑनलाईन शिक्षणासाठी इ कंटेंटची निर्मिती सुरू केली आहे, पण अनेक महाविद्यालयांना अद्याप ही याचा सूर गवसलेला नाही. त्यामुळे नेमके विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसे द्यायचे याचे आव्हान आहे. शहरी भागातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी काही प्रमाणात पायाभूत सुविधा आहेत, पण ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव आहे. अनेक विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांना पगार नसल्याने ते कामावर येत नाहीत, ही अडचण समोर येत आहे. यातून मार्ग काढण्याचे आव्हान संस्थांसमोर आहे. 

आणखी वाचा - पुण्यावर प्रेम करणारे राज ठाकरे, शहराशी वेगळं नातं!

"ऑनलाईन शिक्षण देताना त्यामध्ये प्रत्येक विषयावार इ कंटेंट कसा तयार करावा याचे प्रशिक्षण महाविद्यालयांना देणे गरजेचे आहे. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा महाविद्यालयात निर्माण करण्यासाठी विद्यापीठाकडे अनुदानाची मागणी केली जाणार आहे. द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदलला असल्याने विद्यापीठाने त्यावर कार्यशाळा घेणे गरजेचे आहे."
- डॉ. संजय चाकणे, प्राचार्य, इंदापूर महाविद्यालय

"पुणे विद्यापीठाने अद्याप निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे निकाल लागल्यानंतर ऑनलाईन शिक्षणासाठीची प्रक्रिया सुरु होईल. तसेच विनाअनुदानित महाविद्यालय असल्याने आता प्राध्यापकही उपलब्ध नाहीत. निकाल लागल्यानंतच ऑनलाईन व इतर शिक्षणाची प्रक्रिया सुरू होईल. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन असल्याने झूमसह इतर माध्यामातून शिक्षण दिले जाईल."
- डॉ. सुनील पवार, प्राचार्य, रत्नाई महाविद्यालय, राजगुरुनगर

डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितली आरोग्यासाठी पंचसूत्री; वाचा सविस्तर

"अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र स्टुडंट युनियनने (मासू) सर्वेक्षण केले होते, त्यात ३२ हजार मुलांनी सहभाग घेतला होता. त्यात ऑनलाईन शिक्षण समजले का या प्रश्नावर ७२.९ टक्के मुलांनी नाही हे उत्तर दिले होते. तर ३२ टक्के जणांचे क्लासच झाले नव्हते. ऑनलाईन शिक्षण चांगले देण्यासाठी विद्यापीठाने त्यासाठी सुविधा दिल्या पाहिजेत. केवळ परिपत्रक काढून जबाबदारी संपणार नाही."
- सिद्धार्थ तेजाळे, विभाग प्रमुख, मासू

बारामती पॅटर्नने करून दाखवलं..

- पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये - ९६८
- कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालये - ३४६ 
- अभियांत्रिकी - १०९ 
- इतर महाविद्यालये - ५१३
- विद्यार्थी संख्या - ६.९२ लाख

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Corona Pandemic situation the challenge of e-content in front of colleges