Corona Virus : लॉकडाऊनमध्ये दाम्पत्यांच्या 1200 डब्यांचा गरजूंना आधार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

 तीन स्वयंपाकी शोधून नहार आणि त्यांच्या मित्र परिवाराने हा उपक्रम सुरू केला. मसाले भात, पुऱ्या आणि भाजी पार्सलमध्ये दिले जाते.  सकाळच्या सत्रात साडेचारशे तर सायंकाळी सातशे ते साडेसातशे पार्सल तयार करून त्यांचे वाटप केले जाते. मार्केट यार्ड, स्वारगेट पोलीस स्टेशनमधील अधिकारी- कर्मचारी, भारती हॉस्पिटल मधील डॉक्टर- परिचारिका, बाहेरगावचे शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी मार्केटयार्डमध्ये भाजीपाला घेऊन येणारे ट्रक चालक यांना हे पार्सल पुरविले जाते. ​

पुणे : कोरोनाचे संकट तीव्र होत असताना बिबवेवाडीतील एका दाम्पत्याने पुढाकार घेतल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सुमारे 1200 गरजूंना रोज जेवणाचे डबे (पार्सल) मिळत आहे. परदेशात राहणाऱ्या मुलांच्या आग्रहामुळे या दाम्पत्याने हा उपक्रम सुरू केला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बिबेवाडी- कोंढवा रस्त्यावर राहणाऱ्या सुनील आणि मीना नहार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. नहारांच्या दोन मुली गेल्या दहा वर्षापासून अमेरिकेत आहेत तर मुलगा 3 वर्षांपासून सिंगापूरमध्ये शिकत आहे. नहार यांचे हॉटेल असून ते सध्या त्यांनी भाडेतत्त्वावर दिले आहे.

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास

मुलांना परदेशात शिक्षण घेत असताना अनेकदा जेवणाची अडचण आली होती, त्यामुळे कोरोनाचे संकट आल्यावर गरजूंना जेवणाचे डबे द्या, असा आग्रह मुलांनी केला. त्यातून मित्रांच्या मदतीने 24 मार्चपासून हा उपक्रम सुरू केला, असे सुनील नहार यांनी सांगितले.  

coronavirus : पुणे जिल्ह्यातील 'ही'; २० तपासणी केंद्रे सुरू राहणार २४x७!स्वयंपाक करण्यासाठी गणेश डांगे या मित्राने त्यांना जागा उपलब्ध करून दिली तर, सिद्धार्थ नहार, रोशन नहार, देवेंद्र व्होरा, संजय करपे, विजय नहार गणेश वाडकर आदी मित्र परिवार सुनील यांच्या मदतीला धावला. प्रत्येकाने जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. 

Corona Virus : पुण्यात आणखी ४ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा पोहोचला...

 तीन स्वयंपाकी शोधून नहार आणि त्यांच्या मित्र परिवाराने हा उपक्रम सुरू केला. मसाले भात, पुऱ्या आणि भाजी पार्सलमध्ये दिले जाते.  सकाळच्या सत्रात साडेचारशे तर सायंकाळी सातशे ते साडेसातशे पार्सल तयार करून त्यांचे वाटप केले जाते. मार्केट यार्ड, स्वारगेट पोलीस स्टेशनमधील अधिकारी- कर्मचारी, भारती हॉस्पिटल मधील डॉक्टर- परिचारिका, बाहेरगावचे शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी मार्केटयार्डमध्ये भाजीपाला घेऊन येणारे ट्रक चालक यांना हे पार्सल पुरविले जाते. 

coronavirus: राज्यात रुग्णसंख्या वाढण्याचा धोका;पुण्यातील रूग्णसंख्या पोचणार 40 हजारांवर

 संध्याकाळी नहार आणि त्यांचा मित्रपरिवार प्रत्येकी  दोनशे डबे घेऊन लक्ष्मी रस्ता, स्वारगेट टिळक रस्ता धनकवडी परिसरामध्ये फिरतात आणि गरजूंना पार्सलचे वाटप करतात. 400 पासून सूरु झालेले पार्सल आता 1200 पर्यंत झाले आहेत. नहार यांच्या मित्रांमध्ये काही व्यापारी, कार्यकर्ते आहेत. त्यामुळे होणाऱ्या खर्चातील निम्मा वाटा ते तर उर्वरित खर्च नहार दाम्पत्याकडून केला जातो. 

एका दिवसात मिळणार घरपोच गॅस सिलेंडर 
|या बाबत नहार म्हणाले,"कोरोनाचे हे सामाजिक संकट आहे. गरजूंपर्यंत पोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यात समविचारी मित्रांचेही मोलाचे सहकार्य मिळत आहे. लॉकडाऊन सुरू असेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The couple provided 1200 Tiffins to needy people during lockdown