Daund Election Result 2021:दौंडमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व; भाजपच्या हाती मोजक्या ग्रामपंचायती

daund election result 2021 pune gram panchayat
daund election result 2021 pune gram panchayat

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील  यवत, वरवंड व पाटस या मोठ्या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता राखण्यात यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. लिंगाळी ग्रामपंचायतीत सत्ता खेचून आणण्याच्या दिशेने राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहणार असल्याचे मानले जात आहे. सत्तेच्या दिशेने निघालेल्या गावांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. दुसरीकडे भाजपने खडकी ग्रामपंचायतीत आघाडी मिळवली असून, बोरीपार्दी ग्रामपंचायतीवर आनंद थोरातांचे वर्चस्व राहणार असण्याची चिन्हे आहेत.

दौंड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी दौंड शहरातील नगरमोरी चौकातील शासकीय गोदामात पार पडली. निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी परिसरात मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. तालुक्यातील यवत, वरवंड, पाटस, लिंगाळी, नानगाव, सोनवडी, रावणगाव, देऊळगावगाडा, कुसेगाव ग्रामपंचायतींच्या निकालाचा कल राष्ट्रवादीकडे तर,  खडकी, गोपाळवाडी, मळद, पडवी, सहजपूर, कानगाव ग्रामपंचायतींचा कल भाजपकडे असल्याचे दिसत आहे. तालुका पातळीवरील नेत्यांना गावांमध्ये धक्कादायक पराभव पत्करावा लागला. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. मात्र, जमावबंदी, गुलाल, वाद्य, फटाक्यांना बंदी असल्याने विजयी उमेदवार व समर्थकांच्या आनंदावर विरजण पडले. काही ठिकाणी नियमांचे भंग करून गुलाल, फटक्यांचा वापर करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीची आघाडी  

  • यवत
  • वरवंड
  • पाटस
  • लिंगाळी
  • नानगाव
  • सोनवडी
  • रावणगाव
  • देऊळगावगाडा
  • कुसेगाव

भाजपची आघाडी

  • खडकी
  • गोपळवाडी
  • मळद
  • पडवी
  • सहजपूर
  • कानगाव
     

नामदेव बारवकरांचा नवख्या उमेदवाराकडून पराभव
देऊळगाव गाडा : भीमा पाटस साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष, दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव बारवकर यांचा विशाल बारवकर या नवख्या उमेदवाराकडून पराभव. विजयी उमेदवार संतोष मोरे, गणेश जाधव, कल्पना शितोळे, राजवर्धन जगताप, लता रासकर, अक्षय बारवकर, वैशाली बारवकर, प्रमिला वाघमारे, विशाल बारवकर, विजया बारवकर, श्रद्धा गवळी.

दौंड : दौंड तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू होऊन तीन तास झाले तरी, एकच निकाल अधिकृतपणे जाहीर झालेला आहे. शहरातील नगर मोरी स्थित शासकीय गोदामात आज सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरवात झाली.  दोन कक्षात प्रत्येकी १४ टेबल द्वारे 9 फेऱ्यांद्वारे मतमोजणी केली जात आहे. विविध मतमोजणी प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. दुपारी दीड वाजेपर्यंत केवळ खानवटे गावातील निकाल जाहीर करण्यात आला होता. तेथे स्थानिक पॅनेलने ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे. याबाबत, तहसीलदार संजय पाटील यांना  विचारले असता त्यांनी 'वेळ लागेल' एवढेच उत्तर दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com