यात्रेला निघालेल्या बाप-लेकीवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू 

The death of Father and daughter In accident hit by truck over bridge river Bhima
The death of Father and daughter In accident hit by truck over bridge river Bhima

राजगुरुनगर : यात्रेला निघालेल्या वडिल आणि मुलीचा पुणे- नाशिक महामार्गावरील येथील भीमा नदीच्या पुलावर ट्रकची दुचाकीला धडक बसल्यानेे जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झाला.  निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील सतीश बाळकृष्ण वळसे (वय 32) व त्यांची मुलगी आरोही (वय 3), अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. 

पुण्यात माणुसकीला काळीमा; लोंखडी रॉडने मारल्याने कुत्र्याचा मृत्यू

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश वळसे, त्यांची पत्नी जयश्री आणि मुलगी आरोही हे नागापूर येथील थापलिंग देवस्थानच्या यात्रेला निघाले होते. पिंपरी- काळेवाडी येथून दुचाकीवरून (क्र. एम.एच. 14 डी.एल. 1557) मंचर बाजूला निघाले होते. राजगुरुनगरच्या भीमा नदीच्या पुलावर मागून येणाऱ्या हायवा ट्रकची (क्र. एम.एच. 15 जी.व्ही. 7275) त्यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यामुळे सतीश यांच्या छातीला गंभीर मार लागला; तर आरोही हिच्या डोक्‍यावरून चाक गेले. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता चांडोली ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्‍टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांवर शिक्कामोर्तब; यांची निवड
 

जयश्री याही जखमी झाल्या असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारांकरिता दाखल केले आहे. याबाबत सतीश यांचे चुलत भाऊ संतोष केशव वळसे यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातप्रकरणी खेड पोलिसांनी ट्रकचालक ज्ञानेश्वर सखाराम गोटेकर (रा. वाळवी, ता. सिन्नर, जि. नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. 

अरुंद पुलामुळे धोका 
पुणे- नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर येथील भीमा नदीवरील पूल 109 वर्षांचा आहे. त्याचे आयुष्य संपले, तरी महामार्ग प्रशासनाने अथवा सरकारने त्या ठिकाणी नवीन पूल बांधलेला नाही. सध्याच्या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीला हा पूल खूपच अरुंद पडतो. दोन्ही बाजूंनी ट्रक अथवा बससारख्या मोठी वाहने जात असली, की दुचाकीचालकांना जीव मुठीत धरूनच दुचाकी चालवावी लागते. अनेकदा या ठिकाणी अपघात होऊनही याबाबत दखल घेतली जात नाही. तसेच, या अरुंद पुलामुळे नेहमीच वाहतूक कोंडीही होत असते. 'सकाळ'ने याबाबत अनेकदा आवाज उठविलेला आहे. 

Video:नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज सध्या कोठे आहेत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com